पनवेल : वंचित बहुजन आघाडीने राज्यव्यापी आंदोलन सोमवारी, दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित केले जाणार असून, त्या अनुषंगाने पनवेल महानगर व पनवेल तालुक्याची संयुक्त बैठक पार पडली.
सदर बैठक वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आंदोलन संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. (Vanchit Bahujan Aghadi Protest 6 April 2026)
Also Read : आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर
या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. छाया शिरसाट, महासचिव संतोष मुजमुले आणि अविनाश अडागळे, प्रसिद्धीप्रमुख राहुल चव्हाण, प्रवक्ते कुमार मेटांगे, कामोठे शहर अध्यक्ष व पदाधिकारी तसेच नवीन पनवेल येथील माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Vanchit Bahujan Aghadi Protest 6 April 2026)
बैठकीत आंदोलनाच्या रणनीतीबाबत चर्चा करून सर्वांनी एकजूट दर्शविली आणि नागरिकांना त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.





