Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोल्यात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न

mosami kewat by mosami kewat
April 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
अकोल्यात ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न
       
Akola : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या सामूहिक वाचन उपक्रमांतर्गत अकोल्यात रविवारी (26 एप्रिल 2026) सायंकाळी 5.30 वाजता सुंदराबाई खंडेलवाल टॉवर, जुने बसस्थानक, टॉवर चौक येथे सामूहिक वाचन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाड्याने करण्यात आली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या विविध आघाड्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुस्तकातील मुद्द्यांचे क्रमशः वाचन करत ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिकरीत्या पूर्ण वाचन केले.

या उपक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे सामाजिक आणि ऐतिहासिक आकलन व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष इंजि. धीरज इंगळे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हा महासचिव संगीता आढाव, युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष निलेश देव, महानगर महासचिव गजानन गवई, जि.प. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, प्रभाताई शिरसाट, माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, नगरसेवक शेख शमशू यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्वत महासभा आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता. राज्यभर सुरू असलेल्या या सामूहिक वाचन अभियानाला अकोल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Tags: AkolaMaharashtraPoliticalShivaji Kon Hota Book ReadingVanchit Bahujan Aghadi
Previous Post

उत्तर जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट, नुकसानाची नोंद नाही

Next Post

चोक पॉइंट्स: ट्रम्प यांची जागतिक व्यापार क्षेत्राला दिलेली भेट!

Next Post
चोक पॉइंट्स: ट्रम्प यांची जागतिक व्यापार क्षेत्राला दिलेली भेट!

चोक पॉइंट्स: ट्रम्प यांची जागतिक व्यापार क्षेत्राला दिलेली भेट!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे
बातमी

दिशा सालियान प्रकरण : आदित्य ठाकरेंनी त्या दिवसाचा दिनक्रम, कायदेशीर पुरावे समोर आणावेत – सिद्धार्थ मोकळे

by mosami kewat
September 19, 2026
0

 मुंबई : दिशा सालियान प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली....

Read moreDetails
खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

खोब्रागडे नगरातील पीडित कुटुंबीयांची अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली भेट; न्यायासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

September 19, 2026
श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

श्रीरामपूर दौऱ्यात सुजात आंबेडकर यांचा विविध समाजघटकांशी संवाद; जिल्हा व तालुका कमिटीसोबत बैठक

September 19, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

डोनाल्ड ट्रम्प यांची मोदींच्या तोंडावर सणसणीत चपराक ; ही कसली मैत्री म्हणत, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा

September 19, 2026
जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

जेवणाची ऑर्डर उशिरा आल्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालक आकाश दुबैया यांची निघृण हत्या; सुजात आंबेडकर यांनी घेतली दुबैया कुटुंबाची भेट

September 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home