Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे महापालिकेसाठी ‘वंचित’ सज्ज! शेकडो इच्छुकांनी घेतली पक्ष कार्यालयात धाव; उमेदवारीसाठी मोठी गर्दी

mosami kewat by mosami kewat
December 21, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पुणे महापालिकेसाठी ‘वंचित’ सज्ज! शेकडो इच्छुकांनी घेतली पक्ष कार्यालयात धाव; उमेदवारीसाठी मोठी गर्दी
       
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, वंचित बहुजन आघाडीने (VBA) पुण्यात आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी शेकडो इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्जासाठी पक्ष कार्यालयात मोठी गर्दी केल्याने राजकीय वर्तुळात ‘वंचित’ची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद

उमेदवारी अर्ज घेण्यासाठी केवळ गर्दीच झाली नाही, तर आलेल्या इच्छुकांच्या प्राथमिक मुलाखतीही यावेळी पार पडल्या. पुण्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष कार्यालय फुलून गेले होते. प्रस्थापित पक्षांसमोर वंचित बहुजन आघाडी पुण्यात मोठे आव्हान उभे करणार असल्याचे या गर्दीवरून स्पष्ट होत आहे.

यावेळी निवड प्रक्रियेसाठी आणि इच्छुकांना मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने अनिता चव्हाण, उपाध्यक्ष गौतम ललकारे, दिपक ओवोळ, दिपक कदम, बी. पी. सावळे सर, नवनीत अहिरे, माणिक लोंढे, रिना वानखेडे, हनुमंत फडके यांसह अन्य मान्यवरांचा समावेश होता.

परिवर्तनासाठी इच्छुकांची ओढमुलाखती दरम्यान शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी सांगितले की, “पुणे शहरात वंचितांना न्याय देण्यासाठी आणि शहराचा समतोल विकास करण्यासाठी सुशिक्षित आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवारांची मोठी फळी तयार आहे. ही गर्दी परिवर्तनाची नांदी आहे.”

Tags: Local body electionMaharashtraMaharashtra electionMunicipal CorporationpoliticspuneVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

आमदाराची ‘भाईगिरी’! घाटकोपरमध्ये पराग शाह यांनी रिक्षाचालकाच्या कानाखाली लगावली; नागरिक संतापले…व्हिडिओ पहा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुणे महापालिकेसाठी ‘वंचित’ सज्ज! शेकडो इच्छुकांनी घेतली पक्ष कार्यालयात धाव; उमेदवारीसाठी मोठी गर्दी
बातमी

पुणे महापालिकेसाठी ‘वंचित’ सज्ज! शेकडो इच्छुकांनी घेतली पक्ष कार्यालयात धाव; उमेदवारीसाठी मोठी गर्दी

by mosami kewat
December 21, 2025
0

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, वंचित बहुजन आघाडीने (VBA) पुण्यात आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली...

Read moreDetails
आमदाराची ‘भाईगिरी’! घाटकोपरमध्ये पराग शाह यांनी रिक्षाचालकाच्या कानाखाली लगावली; नागरिक संतापले…व्हिडिओ पहा

आमदाराची ‘भाईगिरी’! घाटकोपरमध्ये पराग शाह यांनी रिक्षाचालकाच्या कानाखाली लगावली; नागरिक संतापले…व्हिडिओ पहा

December 20, 2025
निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात ‘वंचित’ची पाटी जोरात; इतर उमेदवारांची ‘नो एन्ट्री’!

निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात ‘वंचित’ची पाटी जोरात; इतर उमेदवारांची ‘नो एन्ट्री’!

December 20, 2025
नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ

नांदेडमधील धर्मबादमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं; कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ

December 20, 2025
युनेस्कोमध्ये प्रथमच बाबासाहेबांचा पुतळा; जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली

युनेस्कोमध्ये प्रथमच बाबासाहेबांचा पुतळा; जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली

December 20, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home