Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Mumbai : वंचित बहुजन आघाडीचा पाटी–पेन्सिल देऊन सहाय्यक आयुक्तांना अनोखा निषेध

mosami kewat by mosami kewat
September 30, 2025
in बातमी
0
Mumbai : वंचित बहुजन आघाडीचा पाटी–पेन्सिल देऊन सहाय्यक आयुक्तांना अनोखा निषेध

Mumbai : वंचित बहुजन आघाडीचा पाटी–पेन्सिल देऊन सहाय्यक आयुक्तांना अनोखा निषेध

मुंबई : कुर्ला विभागातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे वारंवार लेखी तक्रारी देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वंचित बहुजन आघाडीने आज अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

कुर्ला विभागातील पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, आरोग्यसुविधा यांसारखे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. यंत्रसामुग्री वाटपाच्या नावाखाली महिलांकडून विश्वासाने कागदपत्रे गोळा करण्यात आली, मात्र ही माहिती काही राजकीय पक्षांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. पुरावेही प्रशासनाकडे दिले असल्याचे पक्षाचे नेते स्वप्नील जवळगेकर यांनी सांगितले.

अधिकारी चुकीची व दिशाभूल करणारी उत्तरे देतात किंवा कधी तक्रारींवर उत्तरच देत नाहीत, या निष्क्रिय आणि पक्षपाती कारभाराचा निषेध करण्यासाठी स्वप्नील जवळगेकर यांनी सहाय्यक आयुक्तांना पाटी व पेन्सिल भेट देऊन अनोखा निषेध नोंदवला.

या प्रसंगी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी, संतोष अबुलगे, संध्या पगारे, मालती वाघ, अनिल म्हस्के, अरविंद पवार, सुशांत माने, अशोक आहिरे, सूर्यकांत कांबळे, समीर जगताप, पंकज झणकार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहाय्यक आयुक्तांनी नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तथापि, जर कामकाजात सुधारणा झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा स्वप्नील जवळगेकर यांनी दिला.

Tags: CommissionerkurlaMaharashtramumbaiProtestsVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात ‘संपूर्ण दारूबंदी’ करा; मेळाव्याला रात्री १२ पर्यंत परवानगी द्या – भारतीय बौद्ध महासभेची मागणी

Next Post

धम्मचक्र प्रवर्तन दिनाआधी दीक्षाभूमीवरील समस्या सोडवा – प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी
बातमी

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात!  ट्रकच्या धडकेत १४ भाविक ठार, २९ जण जखमी

by mosami kewat
October 18, 2026
0

ग्वाल्हेर: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे नवरात्रीच्या निमित्ताने शीतला माता मंदिरात दर्शनासाठी भाविक जात असताना धान्याने भरलेल्या एका भरधाव ट्रकने नियंत्रण...

Read moreDetails
कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

कोलकाता हादरले! चोरबागान दुर्गा पूजा मंडपात सप्तमीच्या संध्याकाळी चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर

October 18, 2026
दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

दुष्काळाच्या नावावर सरकारला लागले भिकेचे डोहाळे, शेतकऱ्यांना मदतीचा आराखडा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मात्र डल्ला – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026
चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

चलो अकोला! धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त अकोल्यात लाखांचा जनसागर उसळणार; ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन

October 17, 2026
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

October 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home