अमरावती : यशोदा नगर ते महादेव खोरी या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी (७ ऑगस्ट, २०२५) यशोदा नगर चौकात आंदोलन केले. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात घडत आहेत, तसेच शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येबद्दल वंचित बहुजन आघाडीने २६ जुलै रोजी आंदोलन करून मनपा प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आजच्या आंदोलनात राहुल मेश्राम (जिल्हाध्यक्ष), शैलेश बागडे (उपाध्यक्ष, युवा आघाडी शहर), विनय बांबोले (जिल्हाध्यक्ष, माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट युनियन), नंदू कुमार खंडारे (जिल्हा उपाध्यक्ष), सौ. रीना प्रशांत गजभिये (उपाध्यक्ष, युवा आघाडी), सौ. बागडे, विजय डोंगरे, राहुल भालेराव, आदेश मेडांगे, अलंकार बागडे, रोहित गवई, प्रमोद राऊत, तंतरपाडे, तायडे, मोहोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
Mahabodhi Mahavihara Protest : मुंबईत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनआक्रोश मोर्चा; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती!
मुंबई - महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि महाबोधी मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी आज मुंबईत भव्य...
Read moreDetails