Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अखेर अनुसूचित जातीच्या वस्तीतील विकासकामांना पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती मागे

mosami kewat by mosami kewat
February 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अखेर अनुसूचित जातीच्या वस्तीतील विकासकामांना पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती मागे

अखेर अनुसूचित जातीच्या वस्तीतील विकासकामांना पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती मागे

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश; 670 विकासकामे लागणार मार्गी

अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील विकासकामांना दिलेली स्थगिती अखेर मागे घेतली असून, जिल्ह्यातील सुमारे 670 विकासकामे मार्गी लागणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

सन 2025-26 या वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मात्र दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी संबंधित कामांना स्थगिती देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही सुरू केली होती. संविधानातील तरतुदीनुसार अनुसूचित जातींसाठी मंजूर झालेला निधी त्याच कामांसाठी खर्च करणे अपेक्षित असताना, मंजूर कामांना स्थगिती देणे नियमबाह्य असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला. (Vanchit Bahujan Aghadi)

स्थगितीच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम आणि युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी भाजपा सरकार आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांची मोठी गरज असून उपलब्ध निधी अपुरा पडत असताना विकासकामांना स्थगिती देणे अन्यायकारक असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. तसेच, हा निर्णय मागे न घेतल्यास पालकमंत्र्यांविरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला होता. (Vanchit Bahujan Aghadi)

आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने मंजूर असलेल्या 670 विकासकामांवरील स्थगिती मागे घेतली असून संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीतील विकासकामांना पुन्हा गती मिळणार आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

खोडसाळपणा खपवून घेणार नाही – सागर भवते

याबाबत प्रतिक्रिया देताना युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी प्रशासनाचे आभार मानले. मात्र, यापुढे अनुसूचित जातींच्या विकासकामांत कोणत्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Tags: AdministrativeDecisionamravatiChandrashekharBawankuleCommunityDevelopmentDalitDevelopmentDevelopmentWorksDistrictPlanningCommitteeGrassrootsMovementLocalGovernanceMaharashtraNewsProtestSuccessPublicPolicySCDevelopmentSocialJusticevanchitbahujanaghadi
Previous Post

सावनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

Next Post

फ्रान्स राफेल विमानाचे सोर्स कोड शेअर करणार नाही; पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपले वैमानिक मारले जावेत अशी मोदींची इच्छा आहे ?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक
बातमी

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

by mosami kewat
April 5, 2026
0

नांदेड : वाढत्या महागाई आणि गॅस सिलिंडर दरवाढीच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’...

Read moreDetails
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026
महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home