नागपूर : 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीतर्फे चिचोली वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण आणि फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’ असा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.
जिल्हाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य अजय सहारे, मुख्याध्यापिका विद्या कसरे आणि अंगणवाडी सेविका चंद्रकला आंबुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना फळे आणि बिस्किटांचे वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी चिचोली सर्कलचे कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विधानसभा सचिव वैभव येवले, शहराध्यक्ष शुभम वाहने, आनंद बागडे, नरोत्तम मडकवार, रमेश मेश्राम, कमलेश सहारे, सोनू पाटील, मुन्ना मेश्राम, संघपाल गजभिये, अक्षय बोरकर, अनमोल वाहने, निलेश बोरकर, अर्णव सहारे, शौर्य सहारे, व गाथा सहारे यांचा सहभाग होता.
दुःखद! ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. 'मैं हूं ना', 'कल हो ना हो', 'ओम शांति ओम' अशा...
Read moreDetails





