अकोला : अकोला महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर, नवनियुक्त नगरसेवकांचा जिल्हा शाखेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. टावर चौक येथील पक्ष कार्यालयात आयोजित या सोहळ्यात नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासाचा आणि निष्ठेचा शब्द दिला.
अकोला महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव, पराग गवई, उज्वला प्रवीण पातोडे, शेख शमशू शेख साबीर आणि जयश्री महेंद्र बहादुरकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि नवनियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. नैतिकउद्दीन खतीब होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र पातोडे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनियुक्त नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

“अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही दिवस-रात्र प्रयत्न करू.” अशा भावना नवनियुक्त नगरसेवकांनी व्यक्त केल्या.
या सोहळ्याला आम्रपाली खंडारे, धीरज इंगळे, मजहर खान, गजानन गवई, मनोहर बनसोड, सुनील मानकर, सुनील फाटकर, शोभा शेळके, गोरसिंग राठोड, पवन बुटे, किशोर जामनिक, मंगला शिरसाट, लक्ष्मी वानखडे, अर्चना डाबेराव, नितीन सपकाळ,
शंकर इंगोले, रामा तायडे, पुरुषोत्तम वानखडे, निलेश वाहुरवाघ, विकास सदांशिव, सतीश चोपडे, संतोष कीर्तक, सुयोग आठवले, उमेश देवतडे, वासिफ खान, अन्सार, देवानंद अंभोरे, प्रदीप शिरसाट, गजानन दांडगे, उमाताई अंभोरे, हर्षल लोखंडे, आतिश शिरसाट आणि गोपाल ढोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.





