नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या मौदा तालुका व शहर कार्यकारणीची बैठक मौदा येथे उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष मा. अजय सहारे यांनी भूषवले. त्यांच्यासोबत महासचिव सी.सी. वासे, सचिव किशोर दुपारे व कार्यालयीन सचिव वैभव येवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्कल व प्रभाग बांधणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला. कार्यकर्त्यांना संघटन विस्तारासाठी दिशानिर्देश व कार्यप्रणाली सांगण्यात आली.
बैठकीला जिल्हा व तालुका पातळीवरील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दत्ताजी वाघमारे, किशोर बोरकर, महेंद्र खोब्रागडे, तुलसीदास कांबळे, संजय गजभिये, पंकज रंगारी, दीपक मेश्राम, विजय डाहाट, प्रकाश धनकसार, जयश्री बावनगडे, दिव्यरत्न धारगावे आणि शुभम मानेगुडधे यांचा समावेश होता.
या बैठकीतून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून, संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.