मुंबई : मुंबईतील नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि त्यांच्यावरील उपाययोजना जाणून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश विभागाने ‘लोकआवाज – लोकसंकल्प’ हा विशेष उपक्रम २४ सप्टेंबर २०२५ पासून सुरू केला आहे. मुंबईकरांच्या समस्यांचे निवारण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईकर नागरिक नाले, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि इतर दैनंदिन समस्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत आपली मते आणि तक्रारी मांडत आहेत. मुंबईतील एकूणच समस्यांची माहिती घेऊन, त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने हे पाऊल उचलले आहे.
संपूर्ण मुंबईत उपक्रमाची अंमलबजावणी
प्रभाग समन्वयकांच्या माध्यमातून ‘लोकआवाज – लोकसंकल्प’ हा उपक्रम संपूर्ण मुंबईत व्यापक स्तरावर राबविण्यात येत आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची नोंद घेऊन, त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तत्काळ काम सुरू करण्यात आले आहे.
सहभाग नोंदवण्याचे आवाहन
वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी यांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, त्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि ‘लोकआवाज – लोकसंकल्प’ या माध्यमातून आपली मते व समस्या नोंदवाव्यात. नागरिकांना आपली मते नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा या लिंकवर फॉर्म भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बोधीगया महाविहार बौद्ध धर्मीयांच्या नियंत्रणाखाली येईपर्यंत लढा सुरूच राहील; राजकीय नेत्यांच्या ‘मौना’वर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची तीव्र टीका
मुंबई : बोधगया येथील जागतिक स्तरावरील पवित्र बौद्ध स्थळ असलेल्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध धर्मीयांच्या नियंत्रणाखाली येत नाही, तोपर्यंत वंचित...
Read moreDetails