Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी क्लासेसचे उद्घाटन

mosami kewat by mosami kewat
September 21, 2025
in बातमी
0
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी क्लासेसचे उद्घाटन

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी क्लासेसचे उद्घाटन

‎अकोला : वंचित बहुजन आघाडीने धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून बार्शीटाकळी शहरातील आणि तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी क्लासेस सुरू केले आहेत. बार्शीटाकळी शहर प्रसिद्धी प्रमुख अमित तायडे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या हस्ते झाले.
‎
‎या कार्यक्रमाला अकोला महानगरपालिकेचे माजी गटनेते गजानन गवई यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते शेख नईमोद्दीन, नगरपरिषदेचे माजी गटनेते सुनील शिरसाठ, शहराध्यक्ष अजहर पठाण, माजी नगरसेवक श्रावण भातखडे, माजी रुग्ण कल्याण समिती सदस्य इमरान खान, अनिल धुरंधर, माजी युवा तालुका अध्यक्ष अमोल जामनिक, श्री. खंडारे, दादाराव जामनिक, सय्यद अन्सार, शहर महासचिव शुभम इंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘किन्नर माँ’ संस्थेचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
‎
‎यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी विद्यार्थी आणि उपस्थित पालकांना प्रोत्साहन दिले. जाधव सर या मोफत कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. या उपक्रमासाठी बार्शीटाकळी तालुक्यातील ११० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव जामनिक आणि सुनील शिरसाठ यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक श्रावण भातखडे यांनी केले.
‎
‎वंचित बहुजन आघाडीने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे हा पक्ष केवळ एक राजकीय पक्ष नसून, गोरगरीब लोकांसाठी काम करणारी एक चळवळ आहे, अशी भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडीच्या या उपक्रमाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे.

Tags: AkolaBarshitakliFree English ClassesMaharashtraPoor Students SupportStudents EducationTaluka StudentsVanchit Bahujan AaghadivbaforindiaYouth Empowerment
Previous Post

‘किन्नर माँ’ संस्थेचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक; आगामी निवडणुकांवर चर्चा

Next Post
औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक; आगामी निवडणुकांवर चर्चा

औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक; आगामी निवडणुकांवर चर्चा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रगती जगताप राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीतून राज्यात प्रथम!
बातमी

प्रगती जगताप राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीतून राज्यात प्रथम!

by mosami kewat
November 1, 2025
0

वंचित बहुजन आघाडीचे माजी नगरसेवक दिवंगत सुनील जगताप यांची कन्या! अकोला : राज्यसेवेची पूर्व परीक्षा असताना, वडिलांचे अचानक निधन झाले....

Read moreDetails
नवा विश्वविजेता कोण? भारत-दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक अंतिम सामना उद्या, जाणून घ्या सामना तपशील

नवा विश्वविजेता कोण? भारत-दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक अंतिम सामना उद्या, जाणून घ्या सामना तपशील

November 1, 2025
वंचितच्या इशाऱ्यानंतर बीएमसी आयुक्तांची अधिकाऱ्यांना विशेष सूचना..!

वंचितच्या इशाऱ्यानंतर बीएमसी आयुक्तांची अधिकाऱ्यांना विशेष सूचना..!

November 1, 2025

RSS प्रणित फेसबुक पेजविरुद्ध वंचित बहुजन आघाडीची कारवाई – पुण्यात गुन्हा दाखल

November 1, 2025
नोटीसकडे दुर्लक्ष का? – उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचा सवाल; कारवाईचा इशारा

नोटीसकडे दुर्लक्ष का? – उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचा सवाल; कारवाईचा इशारा

November 1, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home