औरंगाबाद : औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असून, राज्यभर वंचितचा धडाकेबाज प्रचार सुरू आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांच्या दिवसभरात ६ ठिकाणी जोरदार सभा होणार आहेत. या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी शक्तीप्रदर्शन करणार आहे.
असा असेल प्रचार दौरा
प्रा. अंजली आंबेडकर यांच्या दौऱ्याची सुरुवात दुपारी १ वाजता पडेगाव येथून होईल.
त्यानंतर शहरातील विविध महत्त्वाच्या भागांत या सभांचा धडाका सुरू राहील.
- पहिली सभा : दुपारी १:०० वा. – प्रभाग क्र. ४ (पडेगाव)
- दुसरी सभा : दुपारी २:३० वा. – प्रभाग क्र. १७ (भोईवाडा)
- तिसरी सभा : दुपारी ४:०० वा. – प्रभाग क्र. २८ (उस्मानपुरा)
- चौथी सभा : सायंकाळी ५:३० वा. – प्रभाग क्र. ९ (ब्रिजवाडी)
- पाचवी सभा : सायंकाळी ७:०० वा. – प्रभाग क्र. २६ (राजनगर)
- सहावी सभा : रात्री ८:३० वा. – प्रभाग क्र. २४ (अंबिकानगर)
स्थानिक प्रश्न सोडविण्यावर ‘वंचित’चा भर
महानगरपालिका निवडणुकीत यंदा वंचित बहुजन आघाडीने शहरातील मूलभूत समस्या सोडवणे, शहराचा विकास करणे पाणीपुरवठा, प्रभाग तिथे रस्ता आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर भर दिला आहे.
या दौऱ्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. प्रत्येक सभेच्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून, मोठ्या संख्येने नागरिक या सभांना उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.
शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये ‘वंचित’चे झेंडे आणि बॅनर्स झळकत असून, या दौऱ्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना सत्तेत जाण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.






