नाशिक : नाशिकमधील प्रबुद्ध नगर येथे ‘वंचित बहुजन आघाडी’ची नियोजन आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ग्रामीण भागातील तालुकास्तरीय व शहरातील प्रभागानुसार सविस्तर आढावा घेण्यात आला, तसेच अनेक प्रमुख नेत्यांनी आपली मते मांडली.
आरपीआय (आठवले गट) च्या युवा तालुकाध्यक्षांसह १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
या बैठकीत अनेक सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्यांसह ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ (आठवले गट) चे युवा तालुका अध्यक्ष किरण मोंढे यांच्यासह १०० हून अधिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये उत्स्फूर्त पक्षप्रवेश केला. नवीन कार्यकर्त्यांनी बैठकीच्या शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गैरसोय सहन केली जाणार नाही; गैरसोय झालीच तर पालिका अधिकारी यांना ठोकणारच – स्वप्नील जवळगेकर
‘काम दिसेल, प्रचार दिसेल, त्याच उमेदवाराचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर जाईल’ – जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे
आढावा बैठकीदरम्यान जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी उपस्थित इच्छूक उमेदवारांना ‘खडे बोल’ सुनावले. “उमेदवारी मागितली म्हणून उमेदवारी मिळणार नाही. ज्याचे काम दिसेल, प्रचार दिसेल आणि अहवाल चांगला राहील, त्याच उमेदवाराचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल,” असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले. प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिक काम केल्यास विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या बैठकीला प्रामुख्याने महिला जिल्हा अध्यक्ष उर्मिला गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सचिव पंडित नेटावते, जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ भालेराव, बाळासाहेब जाधव, नाना पवार, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, संघटक सागर रिपोर्टे, दीपक भंडारी, युवा महानगर प्रमुख रवी पगारे, महासचिव दीपक पगारे, सम्यकचे जिल्हा अध्यक्ष मिहीर गजबे, युवा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शेजवाळ, शहर उपाध्यक्ष अमोल चंद्रमोरे, भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष चवदास भालेराव, त्रंबकेश्वरचे तालुका अध्यक्ष अरुण काशीद, इगतपुरीचे शरद सोनावणे, विक्रम जगताप, निफाडचे सचिन हिरे, अरुण गांगुर्डे, सिन्नरचे विल्यम शिंदे आदींसह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 
			

 
							




