Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सावनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

mosami kewat by mosami kewat
February 23, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सावनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

सावनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

नागपूर : वंचित बहुजन आघाडीने संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली असून, सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे भव्य ‘कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा’ उत्साहात पार पडला. वंचितांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांच्या या लढाईत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य कार्यकारिणी सदस्य व जिल्हा प्रभारी कुशल मेश्राम यांनी यावेळी केले.

खापरखेडा येथील पंचशील भवन येथे जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी वाडी येथील नवनिर्वाचित नगरसेविका शितल नंदागवळी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. (Vanchit Bahujan Aghadi)

बौद्धिक आणि राजकीय क्रांतीची गरज मुख्य मार्गदर्शक कुशल मेश्राम यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, माईक्रो ओ.बी.सी., आदिवासी, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटीबद्ध आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात ही अस्मितेची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले. (Vanchit Bahujan Aghadi)

सावनेर तालुक्यातील चिंचोली आणि चनकापूर सर्कल मधील शेकडो कार्यकर्त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत पक्षात अधिकृत प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने शारदा खांडेकर, सविता गजभिये, कांता केवट, आम्रपाली लोखंडे, रत्नमाला येवले, ताराचंद शेंडे, सत्यशील खोब्रागडे, जानरावजी वानखेडे, शेखर येवले, तन्मय नाईक, अरुण देशभ्रतार यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला प्रा. अनिकेत मून, महानंदा राऊत (जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी), अनिरुद्ध मडके (जिल्हाध्यक्ष, युवा आघाडी), सी.सी. वासे (महासचिव) यांच्यासह विजय बागडे, धनेश्वर ढोके, वैभव येवले, शुभम वाहने आणि तालुक्यातील पदाधिकारी मिलिंद पकिड्डे, सचिन खंडारे, वसंत मडके आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गंगाधर पाटील यांनी केले, प्रास्ताविक सी.सी. वासे यांनी मांडले, तर उपस्थितांचे आभार कविता मेश्राम यांनी मानले.

Tags: KhaparkhedaMaharashtranagpurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पुणे रेल्वे स्थानक हादरले! खाऊचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

अखेर अनुसूचित जातीच्या वस्तीतील विकासकामांना पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती मागे

Next Post
अखेर अनुसूचित जातीच्या वस्तीतील विकासकामांना पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती मागे

अखेर अनुसूचित जातीच्या वस्तीतील विकासकामांना पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती मागे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 
बातमी

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

by mosami kewat
April 4, 2026
0

दौंड : दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराने...

Read moreDetails
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026
महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

April 4, 2026
Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home