अकोल्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून “एक्स पोज सिरीज” या नावाने सोशल मीडियावर अत्यंत अपमानास्पद व अश्लील भाषेत व्हिडिओ प्रसारित करण्यात आले होते. या प्रकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा व अकोला महानगरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका! “शेतकऱ्यांना भिक नको, त्यांचा हक्क हवा आहे!”
तक्रारदार म्हणून गजानन गवई (गटनेते) यांच्यासह मनोहर बनसोड, आकाश शिरसाट, वंदनाताई वासनिक, आशिष सरपाते, सुनील पाटील, किशोर जामनिक, अशोक दारोकार, चरण इंगळे, शुद्ध धन इंगळे, शरद सुरवाडे, नरेश बांगर, शरद इंगोले आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या कारवाईत जिल्हा महिला अध्यक्ष आम्रपाली ताई खंडारे, ज्ञानेश्वर सुलताने, सम्यकचे जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे, महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, महासचिव गजानन गवई, महासचिव मनोहर बनसोड, पराग गवई, पार्वती ताई लहाने, रंजीत वाघ, बुद्ध रत्न इंगोले, बंटी बागडे, बोराडे भाऊ, बाबा भाई, किशोर मानवटकर, मोहन तायडे, सुरेंद्र सोळंके, संदीप शिरसाट, निखिल शिरसाट, सुरेश मोरे, निलेश वाहूरवाघ, महेंद्र डोंगरे, अमोल कलोरे, ज्योतीताई खिल्लारे, कलीम भाई, पुरुषोत्तम अहिर, बंटी बागडे, सोनू गोपनारायण, शंकर इंगोले, मनोज इंगळे, धम्म अहिर आदींनी सहभाग घेतला.
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, सुजात दादा आंबेडकर यांच्या बदनामीस जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.






