करमाळा : करमाळा तालुक्यातील साडे गावालगतच्या ओढ्याला उजनी दहिगाव उपसा सिंचन चे पाणी सोडण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी, करमाळाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या ओढ्याला पाणी सोडल्यास गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन महिन्यासाठी मिटेल. तसेच ओढ्यालागत च्या शेतकऱ्यांनाही शेतीसाठी या पाण्याचा चांगला फायदा होणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
आठ दिवसात पाणी सोडले नाही तर वंचित बहुजन आघाडी जिल्हा व तालुका शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड, जिल्हा संघटक विलास कांबळे, तालुका अध्यक्ष नवनाथ साळवे, तालुका महासचिव नंदू कांबळे, तालुका उपाध्यक्ष लक्षमण भालेराव, तालुका संघटक शिवाजी भोसले, तालुका संघटक बाळासाहेब कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.