पुणे : शहराचे नाव बदलण्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, आता पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होत आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीने (VBA) या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी divisional railway manager (DRM) यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलून थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात जोरदार चर्चा होत आहे. मात्र याबाबत वंचित बहुजन आघाडीने याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला या नामांतराचा निर्णय घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. जर या काळात मागणी मान्य झाली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
या भेटीदरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, महासचिव विश्वास गदादे, महिला आघाडी अध्यक्षा अनिताताई चव्हाण, माथाडी अध्यक्ष विशाल कसबे, सम्यक विद्यार्थी अध्यक्ष चैतन्य इंगळे यांच्यासह शहर कार्यकारिणीतील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये दीपक ओव्हाळ, चंद्रकांत कांबळे, शामभाऊ गोरे, दीपक कदम, हिरामण वाघमारे, सतीश साबळे, संदीप चौधरी, प्रभाकर सरोदे, दीपक गायकवाड, पितांबर धिवार, गोपाळ वाघमारे, ओंकार कांबळे, परशुराम बनसोडे, अक्षय कांबळे, अरविंद कांबळे, हणमंत फडके, परमेश्वर सनादे, प्रज्योत गायकवाड, सचिन कांबळे यांचा समावेश होता.
विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका
शरद पवार तर भाजपचे हस्तकच - ॲड. प्रकाश आंबेडकरमुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान...
Read moreDetails