लातूर : महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला जन सुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा, या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या लातूर तालुका शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.
वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हा कायदा राज्यातील लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार संपुष्टात आणणारा आहे. या कायद्याच्या नावाखाली सरकारला लोकांवर अन्यायकारक कारवाई करणे शक्य होईल, त्यामुळे हा कायदा रद्द करणे अत्यंत आवश्यक आहे.
लातूर तालुकाध्यक्ष मा. सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुका संघटक जिजापा ढगे, उपाध्यक्ष चंदनशिवे सर, सांस्कृतिक प्रमुख कुलदीप कांबळे, सचिव अशोक कांबळे, मुरुड सर्कल प्रमुख यशपाल सुरवसे, मुरुड युवा शहराध्यक्ष सागर कांबळे, सारसा शाखाप्रमुख आंसराज शिंदे, आकरवाई शाखाप्रमुख बंडूभाऊ सोनवणे, औसा रोड रेल्वे स्टेशन शाखाप्रमुख सतीश मस्के, तसेच किशोर गवळी, नारायण कामठे, बिभीषण मांदळे, प्रणव सुरवसे, अख्तर अरबाज यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी तिवसा तालुक्यातून पाठिंबा; 5 सप्टेंबर रोजी समारोप
अमरावती : बुद्धगया (बिहार) येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सुपूर्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तिवसा तालुक्यातील बौद्ध जनतेने पाठिंबा...
Read moreDetails