अकोला : नगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार मोहीम सुरु केली आहे. यामध्ये प्रा. अंजलीताई आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत, प्रभाग १६ शिवणी खदान परिसरात प्रमुख प्रचार सभा पार पडली.
सभाेत प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी नागरिकांना संबोधित करताना शहरातील स्वच्छता, रस्त्यांची सुधारणा, गटार व्यवस्था, आरोग्य सेवा आणि मनपा शाळांचा दर्जा सुधारण्याच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे लक्ष वेधले.
त्यांनी अकोला शहरवासीयांना निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला संधी देऊन प्रभाग १६ मधील उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.

प्रभाग १६ साठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत:
– उज्वलाताई प्रवीण पातोडे
– जयश्रीताई महेंद्र बहादूरकर
– पराग रामकृष्ण गवई
– शेख शमशु कमर शेख साबीर
प्रचार सभेत मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली, ज्यामुळे उमेदवारांच्या विश्वासार्हतेला बळकटी मिळाली. शहरातील विकास आणि नागरिकांच्या सुविधा सुधारणे हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे बनले आहेत.
या जाहीर सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रचार सभेला नागरिकांची उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






