सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये २३ जून रोजी जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी 5 वाजेनंतर 76 लाख वाढलेले मतदान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, सामाजिक न्याय विभागाने एससी एसटीच्या हक्काचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला त्याचा निषेध नोंदवण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे.
याविषयीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती.या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे, सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मढीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, विक्रांत गायकवाड, अनिरुद्ध वाघमारे, विजयानंद उघडे, शाहिद शेख, रवी थोरात, विनोद इंगळे, श्रीनिवास संगेपांग, महिला अध्यक्ष पल्लवी सुरवसे आदी उपस्थित होते.
जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसमध्ये वाद!
सभागृहात बाजू न मांडल्यामुळे विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमीन पटेल यांना हायकमांडची नोटीस! मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत नुकतेच मंजूर झालेले...
Read moreDetails