पुणे : आज बुधवार दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व मा श्री अनिल आण्णा जाधव यांच्यावर विश्वास ठेवून, युवा आघाडी पुणे शहर अध्यक्ष श्री परेश शंकरराव शिरसंगे यांच्या उपस्थितीत व श्री सचिन कलाधर यांच्या माध्यमातून वडारवाडी, शिवाजीनगर पुणे या भागातील तरुण समाज बांधव श्री केशव विटकर, श्री सिध्दार्थ कांबळे, किरण इरले, सुरज जाधव, किरण गदग, गणेश शिंदे, दिनेश फावरे, राहूल पार्टे यांनी वंचित बहुजन आघाडी मधे जाहीर प्रवेश केला. तसेच श्री शेखर अलकुंटे यांनी प्रस्तावना केली. यावेळी श्री केशव विटकर व श्री सिध्दार्थ कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडी घराघरात पोहचवण्याचा व पक्ष बांधणीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
छत्तीसगडमध्ये मॅग्नेटो मॉलमध्ये बजरंग दलाची तोडफोड; कर्मचाऱ्यांची जात-धर्म विचारून हल्ला
रायपूर : छत्तीसगढ येथे धक्कादायक घटना घडली आहे. ख्रिसमसच्या दिवशी बजरंग दलाच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांकडून कडून एका मॉलमध्ये तोडफोड...
Read moreDetails






