लखमापूर (नाशिक): वंचित बहुजन युवा आघाडी, नाशिक जिल्हा कार्यकारणीच्या वतीने २ दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या दरम्यान निवडणूक पूर्व तयारी, भारतीय संविधान, समाजमाध्यमांचा वापर, आदिवासी प्रश्न आणि पक्षाची भूमिका, आंदोलन -मोर्चे बांधणी आदी विषयांवर चिंतन केले गेले. त्यानंतर वंचित बहुजन युवा आघाडी दिंडोरी तालुक्याच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन देखील पार पडले. या प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, प्रियदर्शी तेलंग, राजवैभव शोभा रामचंद्र, सर्जेराव भारमल, स्नेहल सोहनी आदी मार्गदर्शक उपस्थित होते.
दरम्यान, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, गाणी, मनोरंजन आदी पद्धतीने कार्यकर्ता परिपूर्ण करण्यावर भर देण्यात आली. शिबिराच्या अखेरीस सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
हे संपूर्ण शिबीर संपन्न करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे, जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे, दिंडोरी तालुकाध्यक्ष राहुल सोनवणे, महासचिव विकी दुर्धवळे, तसेच इतर तालुक्यांतून विकी वाहुळे, संतोष वाघ, रवी पगारे, दिपक पगारे आदी अनेक पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.