औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण म्हणून औरंगाबादमधील संजयनगर येथे उभारण्यात आलेली कमान प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अनधिकृतपणे पाडली.
या प्रकाराचा निषेध करत, वंचित बहुजन आघाडीने कमान तात्काळ पुन्हा बांधून देण्याची जोरदार मागणी केली. या मागणीमुळे प्रशासनाने अखेर कमान उभारण्यास मान्यता दिली असून, याबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीने केली आहे.
यासंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अमित भुईगळ, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, औरंगाबाद युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, पश्चिम शहर अध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, युवा शहर अध्यक्ष संदीप जाधव, रुपचंद गाडेकर, मेघानंद जाधव, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बीड अत्याचार प्रकरण : सहआरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन; वंचित बहुजन आघाडीचा पोलिसांना इशारा
बीड : बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहावीत शिकणाऱ्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने आता तीव्र वळण घेतले आहे....
Read moreDetails






