Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Nashik : अंत्यसंस्कारासाठी ‘छत्री’चा आधार! – शिंगवे बहुला येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था

mosami kewat by mosami kewat
September 29, 2025
in बातमी
0
Nashik : अंत्यसंस्कारासाठी ‘छत्री’चा आधार! – शिंगवे बहुला येथील स्मशानभूमीची दयनीय अवस्था
       
नाशिक : नाशिक तालुक्यातील शिंगवे बहुला येथे स्मशानभूमी असूनही मृतदेहांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मरणातूनंतरही अवहेलना सहन करावी लागत आहे. येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड वॉर्ड क्रमांक ७ मधील स्मशानभूमीच्या शेडला गेल्या २५ वर्षांपासून पत्रे नसल्याने, उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आली आहे. भरपावसात अंत्यसंस्कारासाठी चक्क छत्रीचा आधार घ्यावा लागत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

शिंगवे बहुला येथील स्मशानभूमी केवळ एक सांगाडा बनली आहे. छताला पत्रे नसल्यामुळे पाऊस, ऊन आणि वाऱ्यापासून कोणतेही संरक्षण नाही. नुकतेच, अल्प आजाराने निधन झालेल्या तुकाराम गोपाळा पाळदे या ज्येष्ठ नागरिकांच्या अंत्यसंस्कारावेळी ही भीषण परिस्थिती पुन्हा अनुभवयास मिळाली.

पावसात भिजल्या चितेसाठीच्या लाकडा…

सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अंत्यविधीसाठी रचलेली लाकडं पूर्णपणे ओली झाली. पाऊस थांबेल याची वाट पाहण्यात बराच वेळ गेला, पण पाऊस काही थांबला नाही. अखेरीस, अंत्यसंस्कार करायचा कसा, असा मोठा प्रश्न कुटुंबीयांसमोर उभा राहिला. अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनाही छत्रीचा आधार घेऊनच उभे राहावे लागले.

एका बाजूला आधुनिक सुविधांची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे स्मशानभूमीसारख्या मूलभूत ठिकाणीही पत्र्यांसाठी २५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागणे, हे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.

Tags: MaharashtranashikVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

अतिवृष्टीने डाळिंब बागा उद्ध्वस्त: सांगोला निर्यातक्षम डाळिंबाचे १ हजार कोटींचे नुकसान!

Next Post

Kolhapur : उदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post
Kolhapur : उदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

Kolhapur : उदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे सुजात आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुलुंडमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीत कार्यकर्त्यांचा उत्साहात पक्षप्रवेश
बातमी

मुलुंडमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीत कार्यकर्त्यांचा उत्साहात पक्षप्रवेश

by mosami kewat
March 21, 2026
0

मुंबई : मुलुंड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये उत्साहात जाहीर पक्षप्रवेश केला. वंचितच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत...

Read moreDetails
‘डोरेमॉन’चा जादूगार हरपला! प्रसिद्ध दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन

‘डोरेमॉन’चा जादूगार हरपला! प्रसिद्ध दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन

March 19, 2026
कॅप्टन खरात प्रकरणाचा तपास आता SIT कडे; तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली होणार चौकशी

कॅप्टन खरात प्रकरणाचा तपास आता SIT कडे; तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वाखाली होणार चौकशी

March 19, 2026
Mumbai Protest : वाढत्या महागाईविरोधात वरळीत ‘वंचित’चे  आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध

Mumbai Protest : वाढत्या महागाईविरोधात वरळीत ‘वंचित’चे  आंदोलन; केंद्र सरकारचा निषेध

March 19, 2026
बीड हादरले! वाळू माफियांकडून बौद्ध तरुणांवर जीवघेणा हल्ला; सुजात आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुन्हा दाखल

बीड हादरले! वाळू माफियांकडून बौद्ध तरुणांवर जीवघेणा हल्ला; सुजात आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुन्हा दाखल

March 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home