Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home अर्थ विषयक

डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिएतनाममधील व्यावसायिक हितसंबंधांवर आणि व्यापार करारावर प्रश्नचिन्ह

mosami kewat by mosami kewat
August 13, 2025
in अर्थ विषयक
0
डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिएतनाममधील व्यावसायिक हितसंबंधांवर आणि व्यापार करारावर प्रश्नचिन्ह

डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिएतनाममधील व्यावसायिक हितसंबंधांवर आणि व्यापार करारावर प्रश्नचिन्ह

       

संजीव चांदोरकर

डोनाल्ड ट्रम्प, देशांनी त्यांना हव्या तशा अटींवर व्यापार करारावर सह्या कराव्यात म्हणून त्यांचे हात पिरगळत असतात. वरकरणी असे वाटेल हे सारे अमेरिकेचे व्यापारी आणि आर्थिक हित सांभाळण्यासाठी.

पण ट्रम्प यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत.

व्हियेतनाम पहिल्या काही देशांपैकी आहे ज्यांनी ट्रम्प यांच्या अमेरिकेबरोबर व्यापार करार केला.

बातमी आहे की ट्रम्प यांच्या कुटुंबाच्या कंपनीला, Trump Organisation, व्हिएतनामच्या राजधानी जवळ ९९० हेक्टर्स वर लक्झरी गोल्फ क्लब चालवायला परवानगी व्यापार करार होण्याच्या आजूबाजूलाच दिली गेली आहे.

ट्रम्प सार्वजनिक रित्या हे सांगतात की त्यांच्या कंपन्यांशी त्यांचा काही संबंध नाही. त्या कंपन्या त्यांचे कुटुंबीय चालवतात. सगळ्यांना सगळे माहित आहे.

गोल्फ क्लब प्रकल्पासाठी आवश्यक त्या शासकीय मान्यता व कागदपत्रे फास्ट ट्रॅक पद्धतीने निकालात काढली गेली.

व्हिएतनामी रिअल इस्टेट कंपनी Kinh Bac City आणि काही पार्टनर कंपन्या हा प्रकल्प राबवत आहे. या जमिनीवर अनेक व्हियेतनाम मधील छोटे शेतकरी तांदूळ पीक घेतात आणि त्यांचा विविध फळबागा त्यावर आहेत. त्यांना जुजबी compensation देऊन जमिनी खाली करायला सांगितले जात आहे. पुढच्या काही दिवसात प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे तेथे असंतोष आहे.

(Reuters, Economic Times, ऑगस्ट १२ २०२५ पान क्रमांक ४)

मुद्दा ट्रम्प या व्यक्तीला सिंगल आऊट करून शिव्या देण्याचा नाही. सिस्टिमवर चर्चा झाल्या पाहिजेत. ट्रम्प सारखी व्यक्ती अमेरिकेसारख्या लोकशाही देशाची प्रचंड मताधिक्क्याने राष्ट्राध्यक्ष बनते. बनल्यावर आपले कमर्शियल इंटरेस्ट खुले आम वाढवते हा आहे. अमेरिकेच्या व्यापार वाटाघाटी प्रतिनिधी मंडळातील वरिष्ठ अधिकारी, अमेरिकन शासनातील वरिष्ठ अधिकारी एक ब्र काढत नाहीत हा अजून गंभीर मुद्दा आहे.

भारतात धारावी किंवा आंध्र प्रदेशातील अमरावती किंवा तत्सम महाकाय प्रकल्पात डोनाल्ड ट्रम्प यांच्या रियल इस्टेट कंपनीला भागीदारी मिळाली तर भारताबरोबरचा व्यापार करार फास्ट ट्रॅकवर जाईल.


       
Tags: BusinessDonald TrumpTradeus
Previous Post

पुणे पोलिसांना कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये ‘रक्षाबंधन’ साजरा

Next Post

मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांचे हाल; वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर विराट मोर्चा

Next Post
मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांचे हाल; वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर विराट मोर्चा

मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांचे हाल; वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर विराट मोर्चा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन; 'महाभारत'च्या कर्णाची 68 व्या वर्षी अखेर
बातमी

ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन; ‘महाभारत’च्या कर्णाची 68 व्या वर्षी अखेर

by mosami kewat
October 15, 2025
0

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. 'महाभारत' मालिकेत 'कर्ण'ची भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात...

Read moreDetails
भीषण दुर्घटना! जैसलमेरमध्ये धावत्या एसी स्लीपर बसला आग, २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू; १६ गंभीर जखमी

भीषण दुर्घटना! जैसलमेरमध्ये धावत्या एसी स्लीपर बसला आग, २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू; १६ गंभीर जखमी

October 15, 2025
इस्रायल - पॅलेस्टाईन युद्ध आणि मानवी मूल्यांचा संहार : पुढील पिढ्यांसाठी आपण काय सोडत आहोत?

इस्रायल – पॅलेस्टाईन युद्ध आणि मानवी मूल्यांचा संहार : पुढील पिढ्यांसाठी आपण काय सोडत आहोत?

October 15, 2025
सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो आणि जीव घेतो! प्रकाश आंबेडकरांनी सनातन धर्मावर साधला निशाणा

सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो आणि जीव घेतो! प्रकाश आंबेडकरांनी सनातन धर्मावर साधला निशाणा

October 15, 2025
Mumbai : अन्यथा सत्ताधारी आमदारांच्या घरी 'काळी दिवाळी' साजरी करू - वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Mumbai : अन्यथा सत्ताधारी आमदारांच्या घरी ‘काळी दिवाळी’ साजरी करू – वंचित बहुजन आघाडीचा इशारा

October 14, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home