मालेगाव : कळवण तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला. यामुळे कळवण तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला मोठे बळ मिळाले आहे.
हा पक्ष प्रवेश वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. वंचित बहुजन आघाडी नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दिपक पवार व जिल्हा महासचिव संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश झाला.
या पक्ष प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीचे कळवण तालुक्यात संघटन अधिक मजबूत झाले आहे असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम मालेगाव येथे पार पडला. या प्रसंगी जिल्हा पदाधिकारी, तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





