ट्रांसजेंडर (Transgender) पार लिंगी लोक प्राचीन काळापासून जगभरातील संस्कृतीत अस्तित्वात आहेत. यात जगभरातील संस्कृतीत तिचा शोध घेतला, तर ते वेगवेगळ्या उल्लेखाने आपल्याला सापडतात. जसे ४५०० वर्षापूर्वी सुमेरियन संस्कृतीमध्ये ‘गाला’ याजक या अर्थाने अक्काडियन ग्रंथात त्यांचा उल्लेख सापडतो. ९००० ते ३७०० वर्षापूर्वी भूमध्य सागरी समूहामध्ये त्यांचे वर्णन दिसते. जसे, प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये ‘गल्ली’ हे पुजारी जे स्त्री वाचक व्यवहार करत असत. ते पार लिंगी असल्याचे मत काही संशोधक व्यक्त करतात. भारतीय उपखंडात त्याला ‘किन्नर’ अथवा ‘हिजडा’ म्हणून पाहिले जाते. खरे तर ही संज्ञा मर्यादित स्वरूपाची असल्याचे दिसते. ज्या काळात विज्ञान वा शरीर शास्त्र जैव शास्त्र जनुकशास्त्र या विद्याशाखांचा शोध लागलेला नव्हता.
ट्रांसजेंडर (Transgender), लिंग, लिंगभाव ओळख आणि लिंग भूमिका या आधुनिक विज्ञान आणि त्याचे अर्थ १९५० -६०च्या दशकात उदयास आले. परिणामी, ज्या अर्थाने समलैंगिकता पार लिंगी या विषयाचे वर्गीकरण करताना त्याला व्यापकत्व लाभल्याचे आपल्याला दिसते.
जागतिक समाज व्यवस्था पाहता ती धर्म ही संकल्पना व त्याचे नियमन हे पुरुषांनी केले आहे. कुठल्याही धर्माचे संस्थापक ही स्त्री नाही, त्यामुळे पुरुषप्रधानता व पितृसत्ता असे नियम त्यात दिसतात. त्यातही वर्गवारी करत असताना, स्त्रीला दुय्यम महत्त्व दिल्याचे दिसते; मग ते सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक संरचना असो वा कुटुंब व्यवस्था असो. त्यातही बीजशुद्धी व गर्भधारणा या साच्यात बसणारी स्त्रीच उपयुक्त ठरविली गेली आहे. या ठिकाणी समलैंगिकतेला पापाचरण म्हणत व्यक्तीचे नैसर्गिक आचरण निषिद्ध ठरविले गेले. यावर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल. म्हणूनच ट्रान्सजेंडर पार लिंगी ही संकल्पना जरी मानव उत्पत्ती व उत्क्रांती सोबत विकसित होत गेली. तरी त्याचे सामाजिक अवमूल्यन अद्यापही कायम आहे.
आजच्या घडीला ट्रान्सजेंडर, एलजीबीटीए, आयएसएचक्यू त्याची सुरुवात दृश्य स्वरूपात १९७०च्या दशकात लु सूलिवन, अमेरिका यांनी केल्याचे दिसते. त्यांनी सर्वप्रथम लैंगिक अभिमुखता आणि लिंग ओळख या संकल्पना आधुनिक अंगाने मांडायला सुरुवात केली. त्यानंतर जगभरात या विषयी विज्ञान मानववंशशास्त्र कायदा या अंगाने चर्चा व्हायला सुरुवात झाल्याचे दिसते. १९८९ ते २००० च्या दशकात ‘ट्रान्सजेंडर डे ऑफ रिमेंबर अँस’ची सुरुवात होऊन ट्रान्स फोबिक असलेल्या किंवा धार्मिक अंगाने केलेल्या द्वेषापोटी केलेल्या हत्या व हल्ल्यात मृत झालेल्या ट्रान्सजेंडर व्यक्तींना सामूहिक श्रद्धांजली देणे व समाजात जाणीव जागृती करणे. यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. याच दशकात हा विषय व्यापक होत जाऊन जागतिक स्तरावर मानवाधिकार चळवळींनी यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते.
आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर डे ऑफ व्हिजिबिलिटी (ज्याला TDOV, ट्रान्सजेंडर डे ऑफ व्हिजिबिलिटी देखील म्हटले जाते) हा ३१ मार्च रोजी होणारा वार्षिक कार्यक्रम आहे आणि ट्रान्सजेंडर लोकांना साजरे करण्यासाठी आणि जगभरातील ट्रान्सजेंडर (Transgender) लोकांना भेडसावणाऱ्या भेदभावाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे, तसेच एक उत्सव आहे. समाजासाठी त्यांच्या योगदानाबद्दल. या दिवसाची स्थापना ट्रान्सजेंडर कार्यकर्त्याने मिशिगनच्या रॅचेल क्रँडल यांनी २००९ मध्ये केली होती ट्रान्सजेंडर लोकांची LGBT ओळख नसल्याची प्रतिक्रिया म्हणून, केवळ सुप्रसिद्ध ट्रान्सजेंडर – केंद्रित दिवस हा ट्रान्सजेंडर दिवस होता या निराशेचा हवाला देऊन. स्मरण, ज्याने ट्रान्सजेंडर लोकांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला, परंतु ट्रान्सजेंडर समुदायातील जिवंत सदस्यांना मान्यता दिली आणि साजरी केली नाही. पहिला आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दिवस ३१ मार्च २००९ रोजी आयोजित करण्यात आला होता.
वर म्हटल्याप्रमाणे, भारतीय समाजव्यवस्था ही देखील मर्यादित अशा अवकाशात सांस्कृतिक, सामाजिक चौकटीत असल्याचे आपल्याला अद्यापही दिसते. ट्रान्स जेंडर (Transgender) चळवळ ही एकोणिसाव्या दशकात जगभरात मानव अधिकार या अंगाने व्यापक होत गेली. तेव्हा, भारतीय ट्रान्सजेंडर एलटीआयएएचक्यू या विषयी काम करणाऱ्या मानवाधिकार सामाजिक कार्यकर्त्यांनी २००१ साली दिल्ली सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडली तद्नंतर २००५ ला मतदार म्हणून मिळालेले नागरिकत्व…(?) व २०१५ला नालसा प्राधिकरणाने दिलेला अहवाल ते २०१९ चे पारलिंगी विधेयक. असा दीर्घकालीन लढा भारतीय ट्रान्सजेंडर अद्यापही लढत असल्याचे चित्र आहे.
सामाजिक अदृश्यता म्हणजे समाजातील लोकांचा समूह ज्यांना बहुसंख्य जनतेने विभक्त केले आहे किंवा पद्धतशीरपणे दुर्लक्षित केले आहे. त्यामुळे उपेक्षित राहिलेल्यांना समाजात दुर्लक्षित किंवा अदृश्य झाल्यासारखे वाटते. जगभरात लोकशाही आहे. भारतातही आपल्याला लोकशाही असल्याचे दिसते; परंतु अद्यापही ट्रान्सजेंडर (Transgender) समुदायाला सामाजिक अदृश्यतेला बळी पडावे लागते. आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस यातील दृश्यमानता हा शब्द जिवंत माणसाच्या जगण्याची ओळख व त्यासाठी करावा लागणारा संघर्ष यावरून मनुष्य हा अद्यापही वैचारिक मागासलेला आहे, याची उघडपणे साक्ष देतो. हाडामांसाच्या जिवंत व्यक्तीला त्याचे नैसर्गिक लिंगभाव व त्याची अभिव्यक्ती जगण्याचे नैसर्गिक मानवी आनंदाचे साधन आहे व त्याला ते जगावयाचा आहे. यासाठी जर त्याला संघर्ष करावा लागत असेल, तर आपण खरंच प्रगत व पुढारलेले आहोत का? हा प्रश्न विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ट्रान्सजेंडर लोक, प्रौढ आणि तरुण अजूनही स्वातंत्र्य आणि समानतेसाठी पद्धतशीर अडथळ्यांना तोंड देतात. सर्व वयोगटातील ट्रान्सजेंडर लोकांना उच्च दराने हिंसाचार, छळवणूक आणि भेदभावाचा सामना करावा लागतो. जवळजवळ तीन ट्रान्सजेंडरपैकी एकाने जीवनात कधीतरी बेघरपणाचा अनुभव घेतला आहे. ट्रान्सजेंडर लोकांना रोजगार, गृहनिर्माण, आरोग्य सेवा आणि सार्वजनिक निवास स्थानांमध्ये भेदभावाचा सामना करावा लागतो. ट्रान्सजेंडर महिलांवरील हिंसाचाराचे संकट, विशेषत: रंगाच्या ट्रान्सजेंडर महिला, आपल्या राष्ट्राच्या विवेकबुद्धीवर डाग आहे.
शमीभा पाटील,
(लेखिका वंचित बहुजन युवा आघाडीच्या प्रदेश सदस्य आहेत.)