Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

ठाण्यात २.२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! मध्यप्रदेशातून आलेल्या ४ तस्करांना अटक

mosami kewat by mosami kewat
November 16, 2025
in Uncategorized, बातमी
0
ठाण्यात २.२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! मध्यप्रदेशातून आलेल्या ४ तस्करांना अटक
       
ठाणे : अमली पदार्थांच्या तस्करांच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केला आहे. यावेळी. तस्कार्यांकडून  सुमारे १ किलो ७१ ग्रॅम वजनाचा आणि २ कोटी २४ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा ‘एमडी’ ड्रग्ज जप्त करण्यात आला. या घटनेप्रकरणी मध्य प्रदेशातील चार तस्करांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील नौपाडा परिसरात एक परप्रांतीय टोळी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

या माहितीनुसार, पथकाने नौपाडा येथील एमटीएनएल कार्यालयासमोर कौशल्यपूर्ण सापळा रचला. ताबडतोब, एका चारचाकी वाहनातून आलेल्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

या चौघांनी विक्रीसाठी आणलेला १ किलो ७१ ग्रॅम ६ मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज आणि ड्रग्ज वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण २ कोटी २४ लाख ७५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांनी परराज्यातून तस्करी करून हा मोठा ड्रग्ज साठा ठाण्यात आणला होता. नौपाडा पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचे आरोपी इम्रान उर्फ बब्बु खिजहार खान (वय ३७), वकास अब्दुलरब खान (वय ३०), ताकुद्दीन रफीक खान (वय ३०), कमलेश अजय चौहान (वय २३) असे आरोपींचे नाव आहे. या चारही आरोपींपैकी इम्रान खान आणि कमलेश चौहान हे दोघे अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर मध्य प्रदेश राज्यात यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची पुढील तपास पोलिस करत आहे.

Tags: crimepoliceThaneVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे अभिवादन कार्यक्रम

Next Post

बुलढाण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी–काँग्रेसची युती; ५०-५० जागावाटप निश्चित

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ट्रम्प यांचा 'चिकन आऊट' पॅटर्न: दोन आठवड्यांचा सुस्कारा, पण पुढे काय?
अर्थ विषयक

ट्रम्प यांचा ‘चिकन आऊट’ पॅटर्न: दोन आठवड्यांचा सुस्कारा, पण पुढे काय?

by mosami kewat
April 9, 2026
0

- संजीव चांदोरकर तूर्तास तरी आपण सर्वजण निश्वास सोडू शकतो…किमान दोन आठवडे ! (सर्वात महत्त्वाचे तेल आणि गॅसचा पुरवठा). नंतर...

Read moreDetails
राहुरीत ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निधीसाठी ५० हजारांची देणगी, संतोष चोळकेंना बळ

राहुरीत ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निधीसाठी ५० हजारांची देणगी, संतोष चोळकेंना बळ

April 9, 2026
खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

April 9, 2026
वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी

वंचित बहुजन आघाडी व बिरसा ब्रिगेडचे तीव्र आंदोलन; रास्ता रोको यशस्वी

April 9, 2026
पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

पातूर तालुक्यात धम्म विचारांचा जागर; पिंपळडोळीत हजारो उपासकांच्या उपस्थितीत भव्य धम्म परिषद

April 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home