फारुक अहमद यांचा व्हिडीओद्वारे इशारा
नांदेड : व्ही. पी. सिंग यांच्या काळामध्ये नॉन भाजप, नॉन कॉंग्रेस आघाडीचा समन्वयक म्हणून सर्व देशभरातील शक्तीला एकजीव करून व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले. ते सत्तेत आल्यावर सुद्धा मंत्रिपदापेक्षा ओबीसी मंडल कमिशनच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम लागू व्हावा म्हणून आग्रह धरुन मंत्रिपदाला नाकारणारे बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल टिप्पणी करण्यापूर्वी व्हीसी ते राज्यसभेपर्यंत उपकाराचे पद घेतलेल्या भालचंद्र मुणगेकर यांच्यासारख्या व्यक्तीने बाळासाहेबांबद्दल बोलू नये, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुक अहमद यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना असेच करून त्या काळात पुणे करार करायला भाग पाडलं होतं. आता बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करत आहेत. त्या संघर्षाला समजून घेता येत नसेल, तर कमीत कमी त्याला विरोध करू नका, असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहे.
कारण त्या काळात बाबासाहेब म्हणाले होते की, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. हेच बोलण्याची वेळ आता बाळासाहेबांवर येणार नाही हे सुशिक्षित बुद्धिजीवींनी लक्षात घ्यावे, असे आमचे मत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.