गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे – प्रकाश आंबेडकर

 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

पुणे, दि. ३१ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचवा लॉकडाऊन ३० जून पर्यंत करण्यात आल्याची घोषणा केली. या लॉकडाऊन मध्ये श्रीमंतांसाठी निर्णय घेण्यात आले. मात्र गरिबांना वाऱ्यावरती सोडण्यात आले. त्यामुळे हे सरकार श्रीमंतांचे आहे, असा थेट आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

पाचवा लॉकडाऊन करताना काही नियम, अटी घालण्यात आल्या तर काही ठिकाणी नियमांना धरून लॉक डाऊन शिथिल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.त्यात मॉल, हॉटेल तसेच काही कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र गरीब कामगार जे पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतात ते कधी सुरु करणार, याबाबत काहीच खुलासा करण्यात आला नाही, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिवाय कार्यालये चालू करणार पण गरीब कामगार प्रवास कसा करतील, याबाबत केंद्र आणि राज्य सरकार बोलायला तयार नाही.

कोरोनाच्या काळातही हे सरकार श्रीमंतांची बाजू घेत आहे आणि गरिबांना वाऱ्यावर सोडत आहे, असे चित्र पाचव्या लॉक डाऊन मध्ये दिसत आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा जाहीर मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

2 thoughts on “गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे – प्रकाश आंबेडकर

 • June 1, 2020 at 4:33 am
  Permalink

  Yes सर सरकार फक्त श्रिमंताचे तर आहेच पन लुटारुनचे पन आहे

  Reply
  • June 27, 2020 at 9:04 am
   Permalink

   Shame this gov And past gov. We want justice… Banned evm we want VBA government…

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *