Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित समाजाने आता एकत्र यावे लागेल, नाहीतर भविष्यात कोणी वाली राहणार नाही ; अंजलीताई आंबेडकर यांचा इशारा

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 18, 2025
in बातमी, मुख्य पान, राजकीय, विशेष
0
"वंचित समाजाने आता एकत्र यावे लागेल, नाहीतर भविष्यात कोणी वाली राहणार नाही" अंजलीताई आंबेडकर यांचा इशारा

"वंचित समाजाने आता एकत्र यावे लागेल, नाहीतर भविष्यात कोणी वाली राहणार नाही" अंजलीताई आंबेडकर यांचा इशारा

       

वाशिम – “येणारा काळ वंचित घटकांसाठी अत्यंत गंभीर असून, आता सर्व वंचित समाजाने एकत्र न आल्यास भविष्यात त्यांच्या पाठीशी कोणी उभा राहणार नाही,” असा स्पष्ट इशारा वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी दिला. गुरुवारी रात्री वाशिम शहरातील फंक्शन हॉलमध्ये आयोजित संवाद दौऱ्याच्या सभेत त्या बोलत होत्या.

या वेळी त्यांनी जन सुरक्षा कायद्यावर परखड भाष्य केले आणि वाशिम शहरातील अनेक मूलभूत समस्या, जसे की शासकीय शाळा बंद पडणे, रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणीटंचाई, स्वच्छतागृहांची कमतरता, बुरुजी धरणाच्या उंचीवाढीचा अभाव, आदी मुद्द्यांवर प्रशासनावर जोरदार टीका केली. “प्रशासन ढिम्म आहे आणि जमीनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणावर शहरातील जागा बळकावल्या आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

सभेला राष्ट्रीय सचिव आणि जिल्हा निरीक्षक माजी आमदार नतिकोद्दीन खत्तीब, वाशिम विधानसभा निरीक्षक डॉ. तुषार गायकवाड, जिल्हाध्यक्ष किरणताई गिहे, महिला आघाडीच्या ज्योतीताई इंगळे, महासचिव रंगनाथ धांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सचिव खत्तीब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

डॉ. तुषार गायकवाड यांनी मुस्लिम समाजबांधवांना वंचित आघाडीसोबत येण्याचे आवाहन करताना सांगितले की, “सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता प्रस्थापित करावी.” या कार्यक्रमात मुस्लिम समाजबांधवांची उल्लेखनीय उपस्थिती होती. यावेळी अनेक पदाधिकारी, माजी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाशिम नगर परिषदेच्या मागील थेट नगराध्यक्ष निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी टोकाची लढत दिली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वंचित आघाडीची रणनीती राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरणार आहे.


       
Tags: MaharashtrapuneVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”

Next Post

प्रा. किसन चव्हाण यांना दंगलीत अडकवण्याचा पोलिसांचा चेहरा उघड; शेवगावचे तत्कालीनपीआय विलास पुजारीच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

Next Post
प्रा. किसन चव्हाण यांना दंगलीत अडकवण्याचा पोलिसांचा चेहरा उघड; शेवगावचे तत्कालीन पीआय विलास पुजारीच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

प्रा. किसन चव्हाण यांना दंगलीत अडकवण्याचा पोलिसांचा चेहरा उघड; शेवगावचे तत्कालीनपीआय विलास पुजारीच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही!  धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान
बातमी

आम्ही फकीर, कोणाला घाबरणार नाही!  धमक्यांच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आव्हान

by mosami kewat
March 23, 2026
0

नागपूर : आरएसएसच्या मुख्यालयावर आज विशाल संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश...

Read moreDetails
भारताचे सार्वभौमत्व गमावलेले संघाचे मोदी!

भारताचे सार्वभौमत्व गमावलेले संघाचे मोदी!

March 23, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-३

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-३

March 23, 2026
आरएसएस मुख्यालय घेराव ; ॲड. प्रकाश आंबेडकर ने उठाए राफेल और विदेश नीति पर बड़े सवाल

आरएसएस मुख्यालय घेराव ; ॲड. प्रकाश आंबेडकर ने उठाए राफेल और विदेश नीति पर बड़े सवाल

March 23, 2026
नागपुरात 23 मार्चला आरएसएस मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवालांचा भडिमार

नागपुरात 23 मार्चला आरएसएस मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवालांचा भडिमार

March 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home