मुंबई: कुर्ला तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुशांत माने यांनी स्वतःचे घर पक्षाच्या कार्यालयासाठी दिले. या कार्यालयाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांनी केले.
कार्यालय सुरू करण्याचे कारण सांगताना सुशांत माने यांनी म्हटले की, इतर प्रस्थापित पक्षांच्याप्रमाने आपल्या पक्षाची आर्थिक बाजू भक्कम नाही. पण येथील गोर – गरीब जनतेच्या सामजिक, राजकीय आणि आर्थिक लढाई बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत. समाजातील शोषित, पीडित आणि महिलांसाठी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी कार्य करत आहे. बाळासाहेबांच्या या कार्यात घर म्हणजे मोठी गोष्ट नाही. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी आम्ही सर्व त्यांच्या सोबत उभे आहोत.
काही पत्रकार आणि काही नेत्यांकडून वंचित बहुजन आघाडीवर प्रस्थापित पैसे घेण्याचा आरोप केला जातो आणि अशावेळी एक कार्यकर्ता स्वतःचे घर पक्षासाठी देतो त्यावेळी हे आरोप केवळ बदनामी करता केलेले आहेत हे सिद्ध होते हे यावरून स्पष्ट होते. यावर माने यांनी भाष्य केले ते म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमान असलेल्या पक्षाचे स्वाभिमानी नेते आहेत आणि आम्ही त्यांचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत.