]]>
अमरावतीत MIM ची भाजपला साथ – सोशल मीडियावर टीकेची झोड
https://eprabuddhbharat.com/mim-supports-bjp-in-amravati-mayor-election-sparks-social-media-backlash/
Fri, 06 Feb 2026 13:24:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15260अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या १७ व्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची, तर उपमहापौरपदी सचिन भेंडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीपेक्षाही सभागृहात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः एमआयएमच्या (MIM) नगरसेविकेने चक्क भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान सदस्यांना हात उंचावून मतदान करण्यास सांगण्यात आले. भाजप […]
]]>पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
https://eprabuddhbharat.com/wave-of-change-in-palod-as-sujat-ambedkar-calls-for-accountability-at-massive-public-rally/
Wed, 04 Feb 2026 17:33:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15177विकासाचा निधी लुटणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली – सुजात आंबेडकर यांचे जोरदार आवाहन औरंगाबाद: “आतापर्यंत जनतेच्या विकासासाठी आलेला निधी लुटणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. परिवर्तन घडवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या प्रतिनिधींना सत्तेत पाठवावे लागेल,” असे ठाम प्रतिपादन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]
]]>प्रस्थापितांच्या लूटमारीला रोखण्यासाठी वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात पाठवा! – सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-urges-voters-to-send-vanchit-representatives-to-stop-exploitation-by-ruling-parties/
Wed, 04 Feb 2026 13:06:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15163औरंगाबाद : आतापर्यंत सत्तेवर असलेल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी वंचित, बहुजन आणि सामान्य जनतेचा केवळ मतांसाठी वापर केला. विकासाच्या नावाखाली आलेला निधी लुटण्याशिवाय या नेत्यांनी काहीही केले नाही. आता या लुटारू प्रवृत्तीला सत्तेबाहेर फेकण्याची वेळ आली आहे. आपले हक्क, न्याय आणि खरा विकास मिळवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे जोरदार […]
]]>विकासाच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; बोरोळ येथे प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-steps-up-on-development-issues-anjali-ambedkar-addresses-enthusiastic-public-meeting-at-borol-deoni/
Mon, 02 Feb 2026 15:06:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15057देवणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर बोरोळ (ता. देवणी) येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जाहीर सभा प्रचंड उत्साहात पार पडली. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडली. (Anjali […]
]]>शेतकरी हित आणि आरोग्य सुविधा हीच आमची प्राथमिकता; चाकूरमध्ये सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
https://eprabuddhbharat.com/massive-public-turnout-at-sujat-ambedkars-rally-in-chakur-focus-on-farmers-welfare-and-health-facilities/
Sun, 01 Feb 2026 16:41:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14990लातूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत जानवळ (ता. चाकूर) येथे झालेली जाहीर सभा प्रचंड गर्दीमुळे लक्षवेधी ठरली. घोषणाबाजी आणि उत्साही वातावरणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकारणावर प्रहार करत वंचित […]
]]>ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन
https://eprabuddhbharat.com/this-election-is-about-development-not-caste-or-religion-sujat-ambedkar-appeals-at-shirur-tajband/
Sun, 01 Feb 2026 14:10:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14976लातूर : “आपल्या गावाचा, गणाचा आणि गटाचा विकास नेमका कसा असावा, हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ठरवत असते. त्यामुळे ही निवडणूक जाती-धर्माच्या नावावर लढण्याची नसून, विकासाच्या मुद्द्यावर लढण्याची आहे. आतापर्यंत विकासाच्या नावाखाली जनतेची लूट करणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवा,” असे रोखठोक आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत […]
]]>प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी
https://eprabuddhbharat.com/aurangabad-erupts-on-republic-day-as-citizens-symbolically-hang-bjp-mla-narayan-kuches-effigy-over-alleged-election-rigging/
Mon, 26 Jan 2026 12:02:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14707औरंगाबाद : भारतीय लोकशाहीचा उत्सव असलेल्या प्रजासत्ताक दिनी आज औरंगाबादमध्ये एका धक्कादायक आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देऊन निषेध नोंदवला. नेमकी घटना काय? महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचा दिवस सकाळपासूनच तणावपूर्ण राहिला. प्रभाग २४ मध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस […]
]]>पुण्यात ‘शाही’चा खेळ की बोगसगिरीचा मेळ? मार्कर पेनच्या पुसट खुणांनी निवडणूक प्रक्रियेचे वाभाडे!
https://eprabuddhbharat.com/pune-dhayeri-voting-ink-controversy-raises-election-fraud-concerns/
Thu, 15 Jan 2026 12:54:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14462पुणे : लोकशाहीचा उत्सव म्हणून ज्या निवडणूक प्रक्रियेकडे पाहिले जाते, त्याच प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर आज पुण्यातील धायरी भागात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. “एक मत, एक व्यक्ती” या तत्त्वाला हरताळ फासत, चक्क हातावरील शाई पुसून बोगस मतदान करण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. यंदा निवडणूक आयोगाने वापरलेले ‘मार्कर पेन’ हे ‘नावाला’च असल्याचे सिद्ध झाले आहे. नेमका प्रकार […]
]]>नाशिकमध्ये खळबळ: वंचितच्या उमेदवाराच्या भावाला बेदम मारहाण; ‘प्रस्थापित’ घाबरल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप
https://eprabuddhbharat.com/nashik-municipal-election-vanchit-bahujan-aghadi-candidate-brother-assaulted-alleged-caste-abuse/
Wed, 14 Jan 2026 14:57:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14421नाशिक: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक २१ (ड) च्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुप्रिया अहिरे यांच्या भावाला राजकीय सुडापोटी बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. “तुम्ही अनुसूचित जातीचे लोक जनरल जागेवर कसे उभे राहू शकता?” असा जातीवाचक सवाल करत ही मारहाण […]