]]>
सोलापूर हादरले! भाविकांची पिकअप विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू; आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/solapur-tragedy-14-killed-as-devotees-vehicle-plunges-into-well-near-pandharpur/
Mon, 15 Jun 2026 09:19:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18244सोलापूर : माळशिरस तालुक्यात रविवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हसवड–पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन अचानक रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 5 जणांना जीव वाचवण्यात यश आले. मृत सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे भाविक म्हसवड […]
]]>काळजाचा थरकाप! चंपावतमध्ये सराव करताना विद्यार्थ्याच्या गळ्यात घुसला भाला; तरुणाचा दुर्दैवी अंत
https://eprabuddhbharat.com/polytechnic-student-killed-in-tragic-javelin-accident-during-practice-in-uttarakhands-champawat/
Sun, 19 Apr 2026 07:57:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17247Tragic Accident : उत्तराखंड जिल्ह्यात चंपावत येथे घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. वार्षिक क्रीडा स्पर्धेपूर्वी सुरू असलेल्या सरावादरम्यान 20 वर्षीय पॉलिटेक्निक विद्यार्थ्याचा जीव गमवावा लागला. भालाफेकीच्या सरावात असताना चुकून फेकलेला भाला थेट त्याच्या गळ्यात घुसल्याने ही भीषण घटना घडली. शनिवारी सकाळी गोरिलचौर मैदानावर विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारांचा सराव करत होते. याच […]
]]>आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी
https://eprabuddhbharat.com/andhra-pradesh-bus-inferno-13-dead-22-injured-after-early-morning-collision-with-dumper/
Thu, 26 Mar 2026 10:12:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16569आंध्र प्रदेश : मार्कापुरम जिल्ह्यातील रायवरम परिसरात गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. खासगी ट्रॅव्हल्सची बस आणि डंपर यांच्यात झालेल्या धडकेनंतर बसला आग लागून 13 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हरिकृष्णा ट्रॅव्हल्सची बस तेलंगणातील निर्मल येथून नेल्लोरकडे जात होती. पहाटे सुमारे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर बसला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे […]
]]>जयपूरमध्ये ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटमध्ये भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
https://eprabuddhbharat.com/massive-blast-at-oxygen-refilling-factory-in-jaipurs-vki-area-leaves-one-worker-dead/
Sat, 31 Jan 2026 18:44:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14945जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शनिवारी रात्री एका ऑक्सिजन रिफिलिंग फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. विश्वकर्मा औद्योगिक क्षेत्रातील (VKI) रोड नंबर १७ वरील करणी विहार कॉलनीमध्ये ही दुर्घटना घडली. या अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून, फॅक्टरी मॅनेजरसह अन्य एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. नेमकी घटना काय? शनिवारी रात्री ७:४५ च्या सुमारास […]
]]>पिंपरी चिंचवड : काळेवाडी फाट्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, चालक फरार
https://eprabuddhbharat.com/kalewadi-phata-accident-biker-killed-after-truck-hit-driver-absconds-in-pimpri-chinchwad/
Fri, 30 Jan 2026 11:52:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14888पिंपरी-चिंचवड: शहरातील वाहतुकीसाठी वर्दळीचा भाग असलेल्या काळेवाडी फाटा येथे आज सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी जेव्हा काळेवाडी फाटा परिसरात नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ […]
]]>कोलंबियात लँडिंगदरम्यान प्रवासी विमान कोसळले; १५ जणांचा मृत्यू
https://eprabuddhbharat.com/15-killed-as-passenger-plane-crashes-during-landing-in-colombia/
Thu, 29 Jan 2026 06:51:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14839बोगोटा : कोलंबियामध्ये एका छोट्या प्रवासी विमानाला लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत विमानातील सर्व १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात विमान लँडिंग करत असताना व्हेनेझुएलाच्या सीमेजवळ झाला. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, हे विमान सरकारी विमान कंपनी सतेनाद्वारे चालवले जाणारे आणि एका खासगी कंपनीकडून भाड्याने घेतलेले ट्विन-प्रोपेलर […]
]]>भीषण अपघात! टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण आग; एका वृद्धाचा मृत्यू, २४ जखमी
https://eprabuddhbharat.com/tata-ernakulam-express-fire-andhra-pradesh-one-dead-24-injured/
Mon, 29 Dec 2025 07:08:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13514आंध्रप्रदेश : मध्यरात्रीची वेळ… प्रवासी गाढ झोपेत… आणि अचानक आगीच्या ज्वाळांनी डब्यांना विळखा घातला. आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसला (१८१८९) लागलेल्या भीषण आगीत ७० वर्षीय वृद्ध प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले आहेत. नेमकी घटना काय? सोमवारी पहाटे १:३० च्या सुमारास विशाखापट्टणमहून एर्नाकुलमच्या दिशेने जाणारी ही ट्रेन एलामंचिली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली […]
]]>पिंपरी-चिंचवड: लक्ष्मण नगर बस स्टॉपजवळ PMPML बसची शाळकरी मुलीला धडक; तरुणी गंभीर जखमी
https://eprabuddhbharat.com/pimpri-chinchwad-school-girl-hit-by-pmpml-bus-at-laxman-nagar/
Sat, 22 Nov 2025 06:47:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12264पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील लक्ष्मण नगर बस स्टॉप परिसरात आज सकाळी एक दुर्दैवी अपघात घडला आहे. रस्ता ओलांडत असलेल्या एका शाळकरी मुलीला भरधाव वेगात आलेल्या PMPML बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लक्ष्मण नगर येथील […]
]]>मुंबईतील कांदिवलीमध्ये भीषण आग: सात जण भाजले, तिघांची प्रकृती गंभीर
https://eprabuddhbharat.com/kandivali-fire-seven-injured-three-critical/
Wed, 24 Sep 2025 09:33:13 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10438मुंबई : मुंबईतील कांदिवली पूर्व भागात मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत सात जण भाजले असून, यात सहा महिलांचा समावेश आहे. भाजलेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ही आग सकाळी सुमारे ९:३० वाजता चाळीच्या पहिल्या मजल्यावरील एका दुकानात लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग विजेच्या वायरिंग, […]