Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रस्थापितांच्या लूटमारीला रोखण्यासाठी वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात पाठवा! – सुजात आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
February 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रस्थापितांच्या लूटमारीला रोखण्यासाठी वंचितांचे प्रतिनिधी सभागृहात पाठवा! – सुजात आंबेडकर
       

औरंगाबाद : आतापर्यंत सत्तेवर असलेल्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी वंचित, बहुजन आणि सामान्य जनतेचा केवळ मतांसाठी वापर केला. विकासाच्या नावाखाली आलेला निधी लुटण्याशिवाय या नेत्यांनी काहीही केले नाही. आता या लुटारू प्रवृत्तीला सत्तेबाहेर फेकण्याची वेळ आली आहे. आपले हक्क, न्याय आणि खरा विकास मिळवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे जोरदार आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर फर्दापूर (ता. सोयगाव) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (Sujat ambedkar election campaign)

आपल्या भाषणात सुजात आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून ठरावीक नेते आणि पक्ष सत्तेवर कब्जा करून बसले आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक वंचित समाज, शेतकरी, कामगार आणि तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. परिणामी सामान्य जनतेचा विकास खुंटला आहे.

पुढे ते म्हणाले, जोपर्यंत वंचित समाजाचे खरे प्रतिनिधी सभागृहात जात नाहीत, तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही. त्यामुळे संघटित व्हा आणि वंचित बहुजन आघाडीला बळ द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Sujat ambedkar election campaign)

या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. व्यासपीठावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, युवा आघाडीचे औरंगाबाद मध्य शहराध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सोयगाव तालुक्यातील नागरिक, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


       
Tags: aurangabadElection campaignElection newsMaharashtraPoliticalSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

‘गृहमंत्र्यांना बोलवा!’ सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची खंडपीठात आक्रमक भूमिका

Next Post

रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

Next Post
रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

रविंद्र गोविंद ओव्हाळ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर...

Read moreDetails
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home