परभणी : पूर्णा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना भ्रष्टाचारमुक्त आणि समस्यामुक्त नगरपरिषद देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी शहराच्या विकासासाठी महत्वाच्या मुद्द्यांवर बोलले. सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास, स्थानिकांचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.

पुढे ते म्हणाले, नगरपरिषदेला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आणि स्थानिक समस्या समूळ नष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
सुजात आंबेडकर यांनी वंचितांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला संधी देऊन उमेदवारांना मोठ्या विजयी विजयी करण्याचे आवाहन केले.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक सोनोने यांनी वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही, असे सांगत मार्गदर्शन केले.
या जाहीर सभेला पूर्णा शहरातील स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे पूर्णा नगरपरिषद निवडणुकीतील सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते.






