Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन

mosami kewat by mosami kewat
February 5, 2026
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन
       

पंढरपूर : राज्यातील तमाम वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना खऱ्या अर्थाने राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे काम केवळ वंचित बहुजन आघाडीच करू शकते. दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम तसेच भटके-विमुक्त समाजातील नेतृत्वाला संधी देऊन त्यांच्या पाठीशी भक्कम राजकीय ताकद उभी करण्याचे ऐतिहासिक कार्य बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.

पंढरपूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभास्थळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाने सुजात आंबेडकरांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (Sujat Ambedkar)

सुजात आंबेडकर पुढे म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून राज्यातील सत्ताधारी आणि प्रस्थापित राजकीय पक्षांनी वंचित समाजाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आता वेळ आली आहे की, आपण आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या, आपल्या वेदना समजून घेणाऱ्या आणि आपल्या समाजातूनच पुढे आलेल्या प्रतिनिधींना सत्तेत पाठवले पाहिजे.

वंचित बहुजन आघाडी ही केवळ एक राजकीय पार्टी नसून ती सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे, असे सांगत सुजात आंबेडकरांनी मतदारांना संबोधित केले. (Sujat Ambedkar)

स्थानिक विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्र आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, शेतकरी प्रश्न आणि तरुणांच्या भविष्याबाबत गंभीर विचार होणे आवश्यक आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्थापित पक्षांकडे इच्छाशक्ती नसून, वंचित बहुजन आघाडीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी राजकीय शक्ती आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Sujat Ambedkar)

या जाहीर सभेला वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभास्थळी ‘वंचित बहुजन आघाडीचा विजय असो’, ‘शोषित-वंचितांचा आवाज – वंचित बहुजन आघाडी’ अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.


       
Tags: aurangabadLocal body electionMaharashtraMaharashtra electionpolticsSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadivbaforindiavoteZilla parishad champingZp election
Previous Post

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी स्थानिक विकासासाठी कटिबद्ध; गेवराई तांड्यात सुजात आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

Next Post

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा

Next Post
WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्लीच्या पदरी पुन्हा निराशा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
त्र्यंबकेश्वरमध्ये वंचितचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांची उपस्थिती
बातमी

त्र्यंबकेश्वरमध्ये वंचितचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांची उपस्थिती

by mosami kewat
February 25, 2026
0

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून, नुकत्याच पार पडलेल्या भव्य पक्ष...

Read moreDetails
गरिबांचे मरण आणि बँकांचे 'कमिशन' मॉडेल: रिझर्व्ह बँक झोपली आहे का?

गरिबांचे मरण आणि बँकांचे ‘कमिशन’ मॉडेल: रिझर्व्ह बँक झोपली आहे का?

February 25, 2026
RTE प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची अट रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

RTE प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची अट रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

February 25, 2026
गवंडी काम करणाऱ्या मजुराची मुलगी प्रज्ञा इंगळेची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (ITBP) निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सत्कार

गवंडी काम करणाऱ्या मजुराची मुलगी प्रज्ञा इंगळेची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (ITBP) निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सत्कार

February 25, 2026
तिवसा नगरपंचायतवर वंचित बहुजन आघाडीची 'धडक'; पाच दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

तिवसा नगरपंचायतवर वंचित बहुजन आघाडीची ‘धडक’; पाच दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

February 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home