Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आरोग्य, शिक्षण आणि बळीराजासाठी सुजात आंबेडकरांचे रणशिंग; परभणीत प्रचाराचा झंझावात!

mosami kewat by mosami kewat
February 2, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आरोग्य, शिक्षण आणि बळीराजासाठी सुजात आंबेडकरांचे रणशिंग; परभणीत प्रचाराचा झंझावात!
       
परभणी : परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्ह्यात राजकीय वातावरणामध्ये चांगलीच रंगत आली आहे. आज परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जोरदार प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. (Sujat ambedkar Parbhani zp election campaign)

जिल्ह्यातील विविध भागांत घेतलेल्या जाहीर सभांमधून त्यांनी वंचित-शोषित समाजाला सत्तेचे वाटेकरी होण्याचे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी मतदारांना आवाहन केले.

पेठपिंपळगाव ते उखळीपर्यंत प्रचाराचा धडाका

सुजात आंबेडकर यांनी पेठपिंपळगाव (ता. पालम), माकणी (ता. गंगाखेड) आणि उखळी (ता. सोनपेठ) या भागांत जाहीर सभा घेतल्या. या सभांना मोठ्या संख्येने मतदार व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. प्रत्येक सभेतून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत वंचित बहुजन आघाडीचा विकासनिष्ठ अजेंडा ठामपणे मांडला. (Sujat ambedkar Parbhani zp election campaign)

केवळ घोषणाबाजी न करता, सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून गाव आणि गट पातळीवरील विकासाची ठोस रूपरेषा मांडली. ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी पुढील मुद्दे अधोरेखित केले –

– ग्रामीण भागातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था आणि दर्जेदार शिक्षणाचा अभाव

–  स्वच्छ पिण्याचे पाणी, दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधा

– बळीराजाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्याचा निर्धार

सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित-शोषित समाज सत्तेत बसावा यासाठी आयुष्य झोकून दिले आहे. वंचित बहुजन आघाडीने सामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. आपला विकास दुसऱ्याच्या भरवशावर न ठेवता सत्ता स्वतःच्या ताब्यात घ्या आणि आपल्या गावाचा कायापालट करा,” असे आवाहन त्यांनी केले.

या प्रचार सभांदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसिकर, परभणी दक्षिण जिल्हाध्यक्ष मनोहर वावळे, तसेच जिल्हास्तरीय पदाधिकारी, स्थानिक उमेदवार आणि मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या जाहीर सभा  नागरिकांनी घोषणांनी दणाणून सोडला. 

सुजात आंबेडकर यांच्या दौऱ्यामुळे परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला मोठी गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. 

Tags: MaharashtraparbhaniParbhani newsPoliticalpolticsSujat AmbedkarSujat ambedkar electionVanchit Bahujan AaghadivbaforindiaZilla ParishadZp election
Previous Post

विकासाच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक; बोरोळ येथे प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात

Next Post

शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी वंचित मैदानात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे लातूरकरांना आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद
बातमी

Somnath Suryawanshi Case: कोठडीतील मृत्यू प्रकरणी कायद्यात स्पष्टता हवी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा खंडपीठात जोरदार युक्तिवाद

by mosami kewat
March 14, 2026
0

औरंगाबाद : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरील दुरुस्ती अर्जावर...

Read moreDetails
मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

मध्य-पूर्व संघर्षाचा भारतीय जहाजांवर परिणाम; अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था करावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 14, 2026
औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

औरंगाबाद : प्राध्यापक भरती अर्जासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

March 14, 2026
अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

अमर साबळेंच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे नांदेडमध्ये निदर्शने

March 14, 2026
सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा; सरकारने नजरकैद केली रद्द, NSA अंतर्गत केलेली कारवाई मागे

March 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home