बोधगया : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर सध्या बोधगया येथे ‘महाबोधी मुक्ती आंदोलन’ ला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. काल, सुजात आंबेडकर यांनी बौद्ध भिक्षूंसोबत निषेध आंदोलनात भाग घेतला.
यावेळी त्यांनी बुद्ध मूर्तीसमोर आणि महाबोधी महाविहारातील बोधी वृक्षाजवळ प्रार्थना केली. या आंदोलनात आंबेडकर कुटुंबाची तिसरी पिढी सहभागी झाली आहे. सुजात आंबेडकर यांच्या अगोदर त्यांचे वडील प्रकाश आंबेडकर आणि काका भीमराव आंबेडकर यांनीही बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वाखालील या निषेध आंदोलनात सहभाग नोंदवला होता.
सुजात आंबेडकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, वंचित बहुजन आघाडी ‘महाबोधी मुक्ती आंदोलन’ च्या आंदोलनात असून महाराष्ट्रात यासंदर्भात एक जनआंदोलन उभे केले आहे. त्यांनी बोधगया येथे विविध बौद्ध संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली, जेणेकरून एकत्रितपणे एक मोठी मोहीम कशी उभी करता येईल यावर चर्चा केली. सुजात आंबेडकर यांनी विश्वास व्यक्त केला की, धार्मिक अन्याय आणि ब्राह्मणवादाविरुद्धची ही लढाई बौद्धांच्या संयुक्त प्रयत्नांनी जिंकली जाईल.
वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा उत्तर-दक्षिण आढावा बैठक संपन्न
परभणी : वंचित बहुजन आघाडीची परभणी जिल्ह्याची उत्तर-दक्षिण आढावा बैठक परभणी शहरातील वसमत रोड येथील सावली शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात...
Read moreDetails