नांदेड : नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असलेले वंचित बहुजन आघाडीचे (VBA) युवा नेते सुजात आंबेडकर यांनी कंधार येथे वैदू समाज आणि वडार समाजाच्या नागरिकांशी महत्त्वपूर्ण संवाद बैठक घेतली.
नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष:या संवाद सभेला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी सुजात आंबेडकर यांनी दोन्ही समाजाच्या नागरिकांशी त्यांच्या स्थानिक प्रश्नांवर थेट चर्चा केली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
त्यांनी वंचित बहुजन आघाडीची तळागाळातील नागरिकांसाठी काम करण्याची भूमिका स्पष्ट केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोमात सुरू असताना, हा थेट संवाद वंचित बहुजन आघाडीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
या संवाद बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये, राज्य सदस्य अविनाश भोसीकर, नांदेड जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, आकाश जोंधळे, राहुल सोनसळे यांचा समावेश होता.






