युवा नेते सुजात आंबेडकरांचे RSS ला थेट आव्हान!
मुंबई : वंचित बहुजन आघाडीने (VBA) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर ‘संविधान सन्मान महासभा’ यशस्वीरित्या आयोजित केली आहे. या महासभेत जनसागर उसळला आहे. या महासभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) थेट आव्हान देत इस देश में रहना है तो संविधान को मानना होगा असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी ठणकावून सुनावले. या वेळी संविधान प्रेमी जनतेने घोषणांनी भरभरून प्रतिसाद दिला.

युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात RSS ला लक्ष्य केले. देशात राहायचे असेल, तर RSS ला संविधान मानावे लागेल, असे ठणकावून सांगितले.आंबेडकरवाद्यांमध्येच ताकदभाजप, RSS आणि मनुवादी शक्तींना हरवण्याची क्षमता केवळ आणि केवळ आंबेडकरवाद्यांमध्येच असल्याचे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडी हा RSS च्या कार्यालयावर मोर्चा काढणारा पहिला राजकीय पक्ष असल्याचे वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केले.
शिवाजी पार्कवर उसळला जनसागर२५ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या या ‘संविधान सन्मान महासभेला’ संविधान प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. शिवाजी पार्क मैदान भरून गेले आहे. सुजात आंबेडकर यांनी संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले.





