उल्हासनगर : काही दिवसांपूर्वी उल्हासनगर शहराचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष दिनेश पवार यांचे एकुलते सुपुत्र सिद्धार्थ पवार यांचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे व्यथित झालेल्या पवार कुटुंबीयांना धीर देण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी आज दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भेट दिली.
यावेळी सुजात आंबेडकर यांनी संपूर्ण पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी आधार दिला. (sujat ambedkar)
या सांत्वन भेटीच्यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष रोशन पगारे गुरुजी, पंचशील बुद्ध विहार शाखेचे अध्यक्ष मा. अशोक सिरसाठ गुरूजी आणि समता सैनिक दलाचे डिव्हीजन ऑफिसर विजय कांबळे, ॲड. उज्ज्वल महाले, निलेश देवडे, ईश्वरभाऊ सोनवणे आणि नितीन भालेराव उपस्थित होते. या प्रसंगी संपूर्ण उल्हासनगर शहरातील आंबेडकरी कार्यकर्ते व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांनी पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग घेतला. (sujat ambedkar)