मुंबई – बेस्ट (BEST) कर्मचारी यांच्या वतीने डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्त शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी मा.सुजात प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. मा.सुजात आंबेडकर यांच्या हस्ते बेस्ट जनता-२०२३ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. आयोजक आणि कार्मचारी यांनी मा.सुजात प्रकाश आंबेडकर यांना बेस्ट चे मानचिन्ह देऊन सन्मानित केले. प्रसंगी मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर यांनी बेस्टच्या खाजगीकरणावर मार्मिक भाष्य करत वंचित बहुजन आघाडी या खाजगीकरणा विरोधाच्या लढ्यात तुमच्या सोबत आहे. बेस्ट ही मुंबई महिला, जेष्ठ, बालक यांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर राहीली आहे, त्याच्या सुरक्षेसाठी मी स्वःता आणि वंचितचे सर्वच युवक आपल्या सोबत आहेत, असे प्रतिपादन सुजात आंबेडकर यांनी केले..!
जालना: पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न
जालना : आगामी पंचायत समिती (PS) आणि जिल्हा परिषद (ZP) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची (VBA) जिल्हास्तरीय बैठक जालना येथे...
Read moreDetails