महिला दिनानिमित्त स्थानिक महिलांकडून विकास कामाचे उद्घाटन !
मुंबई: गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या विभाग क्रमांक ११३ मधील पंजाबी चाळ येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहल सोहनी पाहणी करत असताना नागरिकांनी आपल्या समस्या सांगितल्या. गेली १० वर्षे येथे कोणतेही विकासकाम झाले नसल्याची नागरिकांनी सांगत आपल्या समस्या सोडवून द्याव्या अशी विनंती स्थानिक महिलांनी वंचितकडे केली. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सबंधित अधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून सदर चाळीचे लादिकरनाचे काम पारित करून घेतले. आज महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक महिलांकडून सदर कामाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर काम करून दिल्याबद्दल स्थानिक महिलांनी वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांचे पत्र देऊन आभार मानले.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष महेश भाऊ सावंत, ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सुनिता ताई तायडे, जिल्हा संघटक रंजंना ताई खंडेराव, भांडुप तालुका महिला सचिव वंदना ताई इंगळे, छाया ताई चक्रे, कविता ताई गायकवाड तसेच स्थानिकांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.