पुणे – दि. ७
बार्टी द्वारे संचालित स्पर्धा परीक्षा संबंधी येणाऱ्या अडचणी बाबत विध्यर्थ्यांनी वंचित युवा आघाडी पदाधिकारी ह्यांची भेट घेऊन बार्टी प्रशासनासोबत चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी गळ घातली असून वंचित बहूजन युवा आघाडीने पुढाकार घेत समस्या सोडवण्यासाठी उद्या दोन युवा पदाधिकारी सोबत पाठविणार असल्याचे आश्वासन दिले.
बार्टी द्वारे संचालित स्पर्धा परीक्षा बाबत विदयार्थ्यांच्या पुढील अडचणी होत्या
- 2019 नंगर MPSC (set) UPSC दिल्ली (set) यांची परिक्षा का झाली नाही.
- 2022 मध्ये UPSC दिल्ली CET exam होणार आहे का?
- पूर्ण वर्षभराचे वेळापत्रक जाहीर करावे.
- MPSC 2021-23 साठीचे प्रशिक्षण फक्त औरंगाबाद येथे व्यतिरिक्त इतर ठिकाणी का घेतली नाही?
- प्रशिक्षण घेण्यात येणाचा परिक्षेच्या जागा वाढल्या पाहिजे.
- mpsc mains आणि मुलाखत यासाठी आर्थिक सहाय्य का करत नाही?
- MPSC (cet) 2019 batch चे काय झाले?
- MPSC CET 2019 च्या Batch न्य काय झालं ?
- सार्थी ही संस्था इंजिनिअरिंग, group B, NET, SET इत्यादी साठीचे financial assistance देते तर बार्टी का देत नाही, असा विध्यार्थी प्रश्न विचारत होते.
प्रबुद्ध भारत कार्यालयात चर्चा झाली. ह्यावेळेस सुजात आंबेडकर, युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, उपसंपादक जितरत्न पटाईत, अक्षय तायडे प्रामुख्याने उपस्थित होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवा आघाडी मंत्रालय पातळीवर देखील पाठपुरावा करणार असल्याचे राजेंद्र पातोडे ह्यांनी स्पष्ट केले. ह्या वेळी विध्यार्थी प्रतिनिधी म्हणून राहुल शिंदे, मनोज शिंदे, रोहित देडगे, मुकेश देडगे, सारिपुत्र धोटे, रवींद्र कांबळे, दीपक कांबळे, किशन कुरे, अपर्णा कांबळे, आकाश कांबळे, अक्षय कांबळे, सुतकर मयूर, राहुल भालेराव, प्रियांका गायकवाड, अक्षय पाटणे, आकाश शेलार हजर होते.