धुळे: धुळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ डिसेंबर रोजी स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे रायगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचा साक्षी ठेवून मनुस्मृतीचे दहन केले आणि स्त्रियांना मुक्त करण्यासाठी आपल्याला भारतीय राज्यघटनेसारखा ग्रंथ दिला. हजारो वर्षाच्या गुलामीच्या जाचातून शूद्रांची अतिसुद्रांची आणि स्त्रियांची मुक्तता केली म्हणून हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ॲड. बापूसाहेब रविकांत वाघ, जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात, जिल्हा उपाध्यक्ष भरतसिंग राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ, जिल्हा उपाध्यक्ष आकाश बागुल, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र बोरसे, राजदीप आगळे, तालुकाध्यक्ष अमोल पवार,धुळे शहर अध्यक्ष फक्त दिन खाटीक, रहीम चाचा पटेल, ईश्वर राजपूत, कल्पनाताई समुद्रे, वंदनाताई बागुल, ज्योतीताई सरदार, लताताई अहिरे, दिनेश कापुरे, अजय मोरे, चिंधा पगारे, संदीप बागुल, गोकुळ जाधव, शबाना अंसारी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.