Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चाळीसगावात भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक; भाजप आमदार मंगेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

mosami kewat by mosami kewat
April 16, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
चाळीसगावात भीम जयंती मिरवणुकीवर दगडफेक; भाजप आमदार मंगेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
       
चाळीसगाव (जळगाव) : भीम जयंती कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

१४ एप्रिल २०२६ रोजी चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान काही व्यक्तींनी गोंधळ घातला. मिरवणुकी दरम्यान गावातील लाईट बंद करून दगडफेक करण्यात आली. यामुळे कार्यक्रमस्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करायला गेलेल्या संदीप कांबळे यांना भाजप आमदार मंगेश चव्हाणने संतप्त भाषेत धमकीवजा वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे तक्रारदाराच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली असून, सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तसेच, या घटनेदरम्यान कार्यक्रमात वाद निर्माण होऊन काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०३ (गुन्हेगारी धमकी), ५०६ (धमकी दिल्याबद्दल शिक्षा) आणि ५०४ (जाणीवपूर्वक अपमान करून भांडणास प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, १९८९ अंतर्गतही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वंचित बहुजन आघाडी जळगाव पश्चिम जिल्हा अध्यक्ष शमीभा पाटील यांनी चाळीसगावमध्ये जाऊन मोर्चा काढला.

Tags: Bhim jayantiDr B R AmbedkarDr Babasaheb Ambedkar jayantiMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

दापोलीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा करिअर गाईडन्स सेमिनार उत्साहात संपन्न

Next Post

आगीचे तांडव! लखनौत काही क्षणांत २०० कुटुंबांचे संसार उघड्यावर; मोठी जीवितहानी टळली

Next Post
आगीचे तांडव! लखनौत काही क्षणांत २०० कुटुंबांचे संसार उघड्यावर; मोठी जीवितहानी टळली

आगीचे तांडव! लखनौत काही क्षणांत २०० कुटुंबांचे संसार उघड्यावर; मोठी जीवितहानी टळली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home