–संजीव चांदोरकर
डोनाल्ड ट्रम्प धमकी देतात की मी म्हणतो तसा माझ्याशी व्यापार करार केला नाही तर मी तुमच्या मालावर ५० टक्के , १०० टक्के आयात कर लावीन
कॉर्पोरेट / वित्त भांडवल धमकी देत असते कि “अमुक आर्थिक धोरणे राबवली नाहीत, तर या देशातील गुंतवणूक काढून दुसऱ्या देशात जाईन किंवा या राज्यातून दुसऱ्या राज्यात डेरा हलवीन”
सत्ताधारी पक्ष धमकी देत असतो की आमच्या पक्षात सामील झाला नाहीत तर तुमच्यावर इडी धाडी टाकीन , चौकश्या मागे लावेन
धर्मगुरू आणि त्यांचे मारेकरी गर्जना करताहेत “आमच्या धर्माची चिकित्सा कराल, प्रश्न विचारलं, तर तुम्हाला मारूनही टाकू”
जात/खाप पंचायत धमकी देताहेत “जातीच्या रूढी, परंपरा पाळल्या नाहीत, जातीबाहेर बेटी व्यवहार केलेत, तर तुम्हाला जातीतून बहिष्कृत करू”
एकखांबी संस्था चालक/मालक सूचक व्यक्तव्य करताहेत “ही संस्था माझया मर्जीप्रमाणेच चालणार, राहायचे तर रहा नाहीतर चालते व्हा”
सरंजामदारी, एका कुटुंबाच्या मालकीच्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्याला समजावताहेत “साहेब जे म्हणतात तेच सत्य मान, नाहीतर आपला रस्ता सुधार”
अनौपचारिक क्षेत्रातील लाखो कंत्राटी स्त्री पुरुष मजुरांना खुलेआम सांगताहेत “जास्तीचा पगार आणि कामाच्या ठिकाणच्या सोयी मागितल्यात, तर तुला काढून त्या गेटबाहेरच्या मजुराला आत घेईन”
नवरा बायकोला सांगतोय “मी सांगतो तसे वागली नाहीस तर ठीक, नाहीतर तुला घरातून बाहेर काढेन”
एकदा फक्त एकदा,
ज्याच्यावर दहशत गाजवली जातेय त्यांनी, त्यांच्यासारख्या इतरांना एकत्र करून , संघटित होऊन दहशत गाजवणाऱ्यांना बेंबीच्या देठापासून ओरडून, नाहीतर शांतपणे कृतीतून सांगावे “जा फूट, तुला काय करायचेय ते कर”
दहशत बसवणारा स्वतःच गोंधळात पडेल. कारण दहशतीखाली दडपलेल्यानी आव्हान दिले तर नक्की काय करायचे हे काही त्यांच्या “पुस्तकात” कोठेही लिहिलेले नसते.
Mumbai : अन्यथा सत्ताधारी आमदारांच्या घरी ‘काळी दिवाळी’ साजरी करू – वंचित बहुजन आघाडीचा इशारा
मुंबई : पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी, कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव मिळावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी वंचित...
Read moreDetails