पात्र विद्यार्थ्यांना लाभाचे वाटप करीत २० जून पर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश पारित.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ मिळावा अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फसण्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेश सद्स्य अक्षय बनसोडे ह्यांनी थेट आयुक्तालयात झालेल्या बैठकीत दिला होता त्यावर जागे झालेल्या समाज कल्याण विभागाचे वतीने ८ जूनला आदेश काढून, पात्र विद्यार्थ्यांना लाभाचे वाटप करीत २० जून पर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे आयुक्तालयाचे तरतूद वितरण आदेश क्र. १७६५, दिनांक १९.०४.२०२२ तसेच आयुक्तालयाचे तरतूद वितरण आदेश क्र. १७९८, दिनांक २२.०४.२०२२ नुसार विभागीय समाज कल्याण ने जिल्हा समाज कल्याण कडून दिलेल्या मागणीनुसार स्वाधारचा निधी मंजूर केलेला आहे. एप्रिल महिन्यात निधी प्राप्त होऊन देखील जून महिना उजाळला तरीही अनेक विद्यार्थी वंचित असल्याने वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा आणि महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिनांक ८ जून रोजी प्रदेश सद्स्य अक्षय बनसोडे ह्यांना आयुक्तांकडे पाठविले होते. हा प्रश्न मार्गी लागणार नसेल तर जबाबदार अधिकारी ह्यांना युवा आघाडी काळे फासेल असा थेट इशारा बनसोडे ह्यांनी दिल्याने त्याच दिवशी हा आदेश कडून झाडाझडती सुरू झाली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम शैक्षणिक वर्ष पुर्ण होऊन देखील अद्याप विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याबाबतची तक्रार आयुक्तालयास करत काळे फसण्याच्या इशार्या नंतर समाज कल्याण विभाग जागा झाला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत सन २०२२-२३ या वर्षाकरीता आयुक्तालयाचे दिनांक १९ आणि २२ एप्रिलच्या आदेशान्वये तरतूद प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत जिल्हा कार्यालयास त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार स्वाधार योजनेच्या मागील वर्षाच्या व चालू वर्षाचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. सोबतच सर्व प्रादेशिक उपआयुक्त यांनी सन २०२२-२३ या वर्षाची आपल्या विभागांतर्गत जिल्ह्यांची माहिती घेऊन ती एकत्रित करून खालील नमुन्यात आयुक्तालयास दिनांक २०.०६.२०२२ अखेर सादर करावी. असेही आदेशात नमूद आहे. मात्र एप्रिलमध्ये मंजूर निधीचे वाटप जून पर्यंत का केले जात नाही, मागील वर्षीच्या खर्चाची रक्कम उपलब्ध असतांना कोण देत नाहीय ? ह्याचा शोध लावून त्यांना वठणीवर आणण्यासाठी युवा आघाडी प्रादेशिक पातळीवर माहिती घेऊन अधिकारी कर्मचारी ह्यांना वठणीवर आणणार असल्याचा इशारा प्रदेश युवक आघाडी महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी दिला आहे.
राज्यात ज्या विद्यार्थ्यांना स्वाधार निधी मिळाला नसेल त्यांनी अक्षय बनसोडे (7083306577) ह्यांना माहिती व्हाटसप करावी असे आवाहन देखील युवा आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
#VBAforIndia #बाळासाहेबआंबेडकर #युवाआघाडी #स्वाधार #SujatAmbedkar #रेखाताईठाकूर #मविआ #सामाजिकन्यायविभाग