India Women vs Australia Women 1st ODI : भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये धावबाद झाली. यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना आज वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात दमदार झाली. स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची शतकी भागीदारी केली. दोघींनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. पण, ११४ धावांवर असताना दोघींमध्ये धाव घेण्यावरुन गैरसमज झाला आणि स्मृती मानधना ५८ धावांवर धावबाद झाली.
स्मृती आणि प्रतिका यांच्यातील ताळमेळाचा अभाव आज पहिल्यांदाच दिसलेला नाही. आश्चर्य म्हणजे, मात्र प्रतिकासोबतच्या १५ डावांत ती तीन वेळा धावबाद झाली आहे. या तिन्ही वेळी त्यांच्यातील ताळमेळाचा अभाव स्पष्ट दिसून आला आहे.
या सामन्यात स्मृती मानधनाने ५८ धावांची खेळी केली. यामुळे ती आणि प्रतिका रावल ही महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीची जोडी बनली आहे. १५ डावांमध्ये त्यांनी ८० पेक्षा अधिकच्या सरासरीने १००० हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत इंग्लंडची अॅटकिन्स आणि टेलर ही जोडी ६८.८३ च्या सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
स्मृतीच्या धावबाद होण्यामुळे भारताला मोठा धक्का बसला असला तरी, संघाची फलंदाजी अजूनही मजबूत स्थितीत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अक्कलकोटमध्ये युवा एल्गार सभा; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोट शहरात भव्य युवा एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये पक्षाचे युवा...
Read moreDetails